
गोंदिया, दि.6 : महिला व बाल विकास विभागाच्या वतीने जिल्हा स्तरावर दर महिन्याचा तिसरा सोमवार “महिला लोकशाही दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. महिलांच्या कोणत्याही विभागाशी संबंधीत समस्या, वैयक्तीक समस्या, गाऱ्हाणी, अडीअडचणी याबाबत महिला लोकशाही दिनात त्यांचे निवेदन स्विकारण्यात येतात अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तुषार पौणिकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. सोमवार १७ एप्रिल २०२३ रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.
सर्व महिला कर्मचारी व महिला मंडळ, बचत गट इतर महिलांसाठी काम करण्याऱ्या संस्था येथील महिला थेट सभेमध्ये येऊन वैयक्तीक तक्रार नोंदवू शकतात. तालुका स्तरावरील अर्ज तालुका स्तरावर चौथ्या सोमवारी सादर करावेत. अर्जाचा नमुना बाल विकास अधिकारी यांचेकडे निःशुल्क प्राप्त होईल. तसेच जिल्हा स्तरीय महिला लोकशाही दिनाकरीता अर्जाचा नमूना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, नविन प्रसासकीय इमारत, तिसरा माळा, रुम नंबर ३६, जयस्तंभ चौक, गोंदिया या कार्यालयात निःशुल्क प्राप्त होईल.
जिल्हा स्तरावर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. जिल्हाधिकारी, गोंदिया यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात १७ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११ वाजता सोमवारला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित केलेला आहे. तरी सर्व महिला मंडळ, बचत गट इतर महिलांसाठी काम करण्याऱ्या संस्था तसेच पिडीत महिलांनी आपले अर्ज कार्यालयात सादर करावे. सर्व महिलांनी याची नोंद घ्यावी असे आवाहान करण्यात येत आहे. तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात आयोजित करण्यात येतो.
न्यायप्रविष्ठ प्रकरणे, विहित नमून्यात नसणारे व आवश्यक कागदपत्राच्या प्रती न जोडलेेले अर्ज, सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी, तक्रार व निवेदने वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर ते अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. सर्व पिडीत महिलांनी सदर कार्यालयात व्यक्तीश: येऊन तक्रार तीन प्रतीत सादर करावी.