
तिरोडा:- भारतीय जनता पार्टी तिरोडा तालुकातर्फे भारतीय जनता पक्षाचा ४३ वा स्थापना दिवस तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या जनसमपर्क कार्यालयात साजरा करण्यात आला यावेळी पंडीत दीनदयाल उपाध्याय,भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी,शामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पक्षाचा ध्वज फडकाविण्यात आला या कार्यक्रमाला प्रामुख्याने तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले, भाजप तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, प.स.सभापती कुंता पटले,सोनाली देशपांडे,जिल्हा सचिव राजेश मलघाटे, जि.प.सदस्य प्रवीण पटले, भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजयकाका ज्ञानचंदानी, युवा मोर्चा शहरअध्यक्ष अमोल तीतीरमारे, तालुका कोशाध्यक्ष रामप्रकाश पटले,शहर महामंत्री दिगंबर ढोक,शहर उपाध्यक्ष मक्रम लिल्हारे, मजूर सहकारी जिल्हा सचिव उमाकांत हारोडे, तालुका महामंत्री,किसान आघाडी तालुका महामंत्री संजय पारधी,प्रचार प्रमुख नितीन पराते,युवा मोर्चा उपाध्यक्ष गौरव निनावे, सरपंच मिलिंद कुंभरे, स्वाती चौधरी, भाजप कार्यकर्ते संतोष कटरे, महादेव कटनकार,अनुप बोपचे, वासू कनोजे उपस्थित होते.