रेल्वे तिकीटांसह दलालांना अटक

0
31

 गोंदिया-आमगाव येथील इंदिरानगर येथून बनावटी रेल्वे तिकीट तयार करणार्‍या दलालासह २४ हजार ३३१ रुपये किमतीचे ५७ तिकीटे जप्त करण्यात आले. ही कारवाई रेल्वे सुरक्षा दलाने २ एप्रिल रोजी केली. प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा, यासाठी रेल्वेचे आरक्षण हा प्रवाशांसाठी नेहमीच चिंतेचा राहते. याचाच लाभ उचलत काही दलाल बनावटी तिकीटांची विक्री करीत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
याच अनुषंगाने नागपूर विभागीय सुरक्षा आयुक्त रेसुब नागपूर पंकज चुघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे गुप्तचर शाखा गोंदियाचे प्रभारी निरीक्षक अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक के. दुबे, सहाय्यक उपनिरीक्षक एस. एस. ढोके, हवालदार नसीर खान यांनी २ एप्रिल रोजी आमगाव येथे मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई केली. आमगाव येथील इंदिरानगर येथील सीएससी केंद्र चालविणार्‍या विजय हा स्वत:च्या वैयक्तिक आयडीवरून बनावटी तिकीट तयार करुन विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले. त्याच्याकडून २४ हजार ३३१ रुपये किमतीचे ५७ तिकीटे जप्त करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.