
राजुरा-ओबीसीबद्दल देशात अनेक गैरसमज जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आले आहेत. वास्तविक विद्वत्ता आणि कष्टाला सन्मान देणारे लढवय्ये ओबीसी असून बहुतांश राजकीय पक्षांनी संकुचित राजकारण करीत त्यांचे खच्चीकरण करण्यात धन्यता मानली. महात्मा फुले या ओबीसीच्या खर्या नेत्याने मार्ग दाखविला. मात्र, त्यांचे प्रगल्भ विचार संकुचित करण्यात आले. आता ओबीसींचा र्शमाला सन्मान देणार्या संस्कृतीचा जाज्वल्य इतिहासावर दृष्टिक्षेप टाकत स्वत:ची राजकीय व्यवस्था उदयास आणल्यास ओबीसींचे भवितव्य देदीप्यमान होईल, असे प्रतिपादन नाशिक येथील साहित्यिक व ज्येष्ठ ओबीसी नेते श्रावण देवरे यांनी केले.
राजुरा येथील जगतगुरू तुकोबाराया सार्वजनिक वाचनालय येथे आयोजित महात्मा फुले आणि डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित संयुक्त कार्यक्रमात श्रावण देवरे बोलत होते. अध्यक्षस्थानी दत्तात्रेय मोरे होते. या कार्यक्रमाचे उद््घाटन किरण ढुमणे यांनी केले. प्रमुख अतिथी गोरक्षनाथ आखाडे, शोभा देवरे, लक्ष्मण घुगुल, विजय मोरे, नंदकिशोर वाढई, ज्ञानेश्वर शिरसाट इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी किरण ढुमणे म्हणाले की, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठा वैचारिक वारसा दिलेला असताना आपण त्यांचे विचार सर्व ओबीसीपयर्ंत पोहोचवून त्यांना सर्मथ करून सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय परिवर्तन घडवून आणू शकतो. प्रास्ताविक दिनेश पारखी, संचालन मधुकर डांगे व आभार संभाजी साळवे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जगदीश पिंगे, दिलीप गिरसावळे, लक्ष्मण तुराणकर, सुधीर झाडे, विनोद बोबडे, मधुकर मटाले, राकेश देवाळकर, बाबुराव झटाले, बाबुराव मुसळे, अँड. मारोती कुरवटकर, पुंडलिक वाढई, अमोल राऊत, प्रणीत झाडे, धर्मू नगराळे यांनी सहकार्य केले.