28 लाखाचे बक्षीस असलेल्या दोन महिला नक्षल्यांना बालाघाट पोलिसांनी केले ठार

0
42

गोंदिया(खेमेंद्र कटरे),दि.22– शेजारील मध्यप्रदेश राज्यातील नक्षलग्रस्त बालाघाट भागात शुक्रवार-शनिवारच्या मध्यरात्री पहाटे तीन वाजे दरम्यान पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत टाडा दलमच्या एरिया कमांडर आणि गार्ड असलेल्या दोन ज्येष्ठ महिला नक्षलवाद्यांना पोलिसांनी ठार केल्याची घटना घडली.या दोघींवर 14-14 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.गेल्या वर्षीही बालाघाट पोलिसांनी ६ नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता.घटनेची माहिती होताचा पोलीस उपमहानिरिक्षक बालाघाट संजय कुमार, बालाघाटचे पोलीस अधीक्षक समीर सौरभ आणि हॉक फोर्सचे उच्च अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली.परिसरातील कडला जंगलात हॉकफोर्स आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. ज्यात जवानांनी सुनीता आणि सरिता या दोन महिला नक्षलवाद्यांना चकमकीत ठार केले. सुनीता टाडा दलमच्या भोरम देव, एरिया कमांडर होती.ती सध्या विस्तार दलममध्ये काम करत होती. तर सरिता नक्षलवादी कबीरची रक्षक होती.ती खट्या मोचा दलममध्ये कार्यरत होती.ती सुध्दा विस्तार दलममध्ये सक्रिय होती. दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले असून पोलिसांनी दोन्ही मृतदेह जिल्हा रुग्णायात हलविले.दोन्ही महिला नक्षलवाद्यांवर प्रत्येकी 14 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. या घटनेनंतर बालाघाट पोलिसांनी जंगलात शोधमोहीम पुन्हा सुरू केल्याची माहिती बालाघाटचे पोलीस अधिक्षक समीर सौरभ यांनी दिली.