26.6 C
Gondiā
Sunday, August 23, 2026
Home Top News छत्तीसगडमध्ये नक्षली हल्ला:10 जवान धारातीर्थी, 80 जवान तीन दिवस शोध घेत होते;...

छत्तीसगडमध्ये नक्षली हल्ला:10 जवान धारातीर्थी, 80 जवान तीन दिवस शोध घेत होते; परत येताच कारस्थानाचे बळी

0
59

तीन दिवसांपूर्वी अरणपूर जंगलात मोठ्या घडामोडी घडणार असे इनपुट मिळाले होते. त्यानंतर आम्ही ८० जवान वेगवेगळ्या वाहनांतून अरणपूरला ठाण्याला पोहोचलो. पायी जात शोध घेतला. बुधवारी सकाळी ११ वाजता सर्व जवान ठाण्यात परतले होते. या ठिकाणी ८ गाड्या आल्या होत्या.

सर्व ८० जवानांना इथूनच दंतेवाडाला परत जायचे होते. हा परिसर संवेदनशील असल्याने गाड्यांना थोडे अंतर ठेवून जाण्याच्या सूचना असतात. प्रथम दोन गाड्या निघाल्या. काही मिनिटानंतर आम्ही गाडी बसताच स्फोटाचा प्रचंड मोठा आवाज कानी पडला. धोक्याची जाणीव होताच गाडीतून उतरुन आम्ही जंगलातून वाट काढीत घटनास्थळावर पोहोचलो. ठाण्यापासून दीड किमी अंतरावर मोठा खड्डा पडलेला होता. दुसऱ्या क्रमांकाच्या गाडीच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या होत्या. धाराितर्थी पडलेल्या जवानांची शस्रास्रे तुटून फुटून बाजूला पडले होते. एक एके -४७ आणि एक इन्सान्स रायफल मिळाली नाही.

गावकरी जवळच वर्गणी गोळा करीत होते पण त्यांनाही कळले नाही : घटनास्थळाच्या १०० मीटर दूरवर गाडी थांबवून गावकरी आमा तिहार सणासाठी वर्गणी गोळा करीत होते. नक्षल्यांनी ज्या गाडीला उडवले त्यालाही गावकऱ्यांनी थांबवले होते. परंतु नक्षल्यांनी स्फोटके पेरून ठेवल्याचे त्यांनाही कळले नाही.

डीआरजी: नक्षल्यांच्या गनिमी काव्याला त्यांच्या पद्धतीने उत्तर देतात : छत्तीसगडच्या नक्षल्यांच्या मुकाबला करण्यासाठी सन २००८ मध्ये डीआरजी (जिल्हा राखीव दल) स्थापन करण्यात आले आहे.यात स्थानिक तरुणांचा समावेश आहे. त्यांना या परिसराची खडानखडा माहिती आहे. आदिवासींशी संबंध असल्याने नक्षल्यांचा मुकाबला करताना त्यांचेही सहकार्य सहज मिळते. डीआरजीने अनेक मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नक्षल्यांच्या गनिमी काव्याला त्यांच्याच पद्धतीने उत्तर दिले जाते.

blank

40 किलो स्फोटकांचा वापर केल्याची शक्यता
फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मते, स्फोट घडवून आणण्यासाठी ४० किलो स्फोटकांचा वापर करण्यात आल्याची शक्यता आहे. यामुळेच या स्फोटाचा आवाज अनेक किलोमीटर दूरपर्यंत ऐकला गेला. वाहनाचे चेसिस आणि चाक ५० मीटर दूर पडले होते. हा गेल्या दोन वर्षांमध्ये पहिला मोठा नक्षलवादी हल्ला आहे. एप्रिल २०२१ मध्ये सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर झालेल्या चकमकीत २२ जवान शहीद झाले होते.

– पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. गृह मंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना शक्य तितकी मदत करण्याचे आश्वासन दिले.

बुधवारी छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 11 जवान शहीद झाले. हे जवान जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) युनिटचे होते. याशिवाय त्यांच्या वाहनाच्या चालकाचाही या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांची टीम पावसात अडकलेल्या सुरक्षा दलांना वाचवण्यासाठी जात होती. दरम्यान, नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोटात पोलिसांचे वाहन उडवले.

दंतेवाडा जिल्ह्यातील अरणपूर पोलीस स्टेशन हद्दीतील अरणपूर-समेलीदरम्यान हा हल्ला झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकही झाली आहे. या चकमकीदरम्यान माओवाद्यांनी वाहनावर बॉम्ब फेकले.

हा फोटो धनी यादवचा आहे. तो डीआरजी वाहन चालवत होता. या हल्ल्यात त्याचेही प्राण गेले.
हा फोटो धनी यादवचा आहे. तो डीआरजी वाहन चालवत होता. या हल्ल्यात त्याचेही प्राण गेले.

हल्ल्यासाठी नक्षलवाद्यांची मोहीम सुरू

बस्तरमध्ये नक्षलवाद्यांची TCOC (टॅक्टिकल काउंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन) सुरू आहे. या काळात अनेकदा नक्षलवादी अनेक मोठ्या घटना घडवून आणतात. टीसीओसीच्या पार्श्वभूमीवर फोर्सदेखील अलर्ट मोडवर आहे. बस्तरच्या सर्व जिल्ह्यांमध्ये शोधासाठी जवान पाठवले जात आहेत.

घटनेनंतर आलेल्या जवानांनी शहीद जवानांची शस्त्रे बाहेर काढून त्यांना सुरक्षित ठेवले.
घटनेनंतर आलेल्या जवानांनी शहीद जवानांची शस्त्रे बाहेर काढून त्यांना सुरक्षित ठेवले.

5 दिवसांपूर्वी केले होते नक्षलवाद्यांचे तळ उद्ध्वस्त

पाच दिवसांपूर्वीच सुरक्षा दलांनी सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला होता. नक्षलवाद्यांच्या दैनंदिन वापरातील वस्तूंसह मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला होता. या कॅम्पमध्ये जवळपास 25 ते 30 नक्षलवादी असल्याचे सांगण्यात येत आहे. जवान आल्याची माहिती मिळताच सर्व नक्षलवादी पळून गेले.

आयईडी स्फोटानंतर रस्त्यावर खोल खड्डा पडला होता. सूत्रांनुसार, हल्ल्यात किमान 50 किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला आहे.
आयईडी स्फोटानंतर रस्त्यावर खोल खड्डा पडला होता. सूत्रांनुसार, हल्ल्यात किमान 50 किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला आहे.

पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख, बघेल म्हणाले- नक्षलवाद्यांना सोडणार नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले- दंतेवाडा येथे छत्तीसगड पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. हल्ल्यात शहीद झालेल्या शूर जवानांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे बलिदान सदैव स्मरणात राहील. शोकग्रस्त कुटुंबांप्रति माझ्या संवेदना.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या हल्ल्यावर शोक व्यक्त केला आहे. म्हणाले- शहिदांच्या कुटुंबियांप्रति माझ्या संवेदना. नक्षलवाद्यांना सोडले जाणार नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना सर्वतोपरी मदत करण्याचे सांगितले आहे.

घटनेची माहिती मिळताच फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. यासोबतच आरोग्य कर्मचारीही पोहोचले होते.
घटनेची माहिती मिळताच फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. यासोबतच आरोग्य कर्मचारीही पोहोचले होते.

आठवडाभरापूर्वी आमदारांच्या ताफ्यावर झाला होता हल्ला

विजापूरमधील काँग्रेस आमदार विक्रम मांडवी यांच्या ताफ्यावर माओवाद्यांनी आठवड्याभरापूर्वी हल्ला केला होता. जिल्हा पंचायत सदस्या पार्वती कश्यप ज्या वाहनात बसल्या होत्या त्या वाहनावर गोळीबार झाला. सर्वजण सुरक्षित आहेत. आमदार विक्रम मांडवी, जिल्हा पंचायत सदस्य यांच्यासह काँग्रेस नेते गांगलूरला गेले होते. येथील साप्ताहिक बाजारात मंगळवारी नुक्कड सभेचे आयोजन करण्यात आले होते. परतत असताना पडेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी धावत्या वाहनांवर गोळीबार केला.

BGL ने 2 वर्षांपूर्वी सैनिकांवर गोळीबार केला होता, 22 जवान शहीद झाले होते

3 एप्रिल 2021 रोजी विजापूर जिल्ह्यातील ताररेम पोलीस स्टेशन क्षेत्रातील टेकलगुडा येथे झालेल्या चकमकीत 22 जवान शहीद झाले होते, 35 हून अधिक जखमी झाले होते. त्यांच्यावर 350 ते 400 नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये माओवाद्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांचीही उपस्थिती होती. जवानांवर मोठ्या प्रमाणात बीजीएल (बॅरल ग्रेनेड लाँचर) फायरिंग करण्यात आली होती. यासोबतच डीआरजी, सीआरपीएफ, कोब्रा बटालियनच्या जवानांकडून शस्त्रेही लुटण्यात आली होती.

राकेश्‍वर सिंह मन्हास या कोब्रा जवानाचे अपहरण करण्यात आले. जवानांकडून शस्त्रेही लुटण्यात आली. या चकमकीत नक्षलवाद्यांनी त्यांच्या TCOC दरम्यान ही घटना घडवून आणली. नंतर जवान राकेश्‍वर सिंग यांना माओवाद्यांनी सोडले.