24.6 C
Gondiā
Saturday, August 22, 2026
Home गुन्हेवार्ता शहरात लुटमारी करणारी टोळी अटकेत

शहरात लुटमारी करणारी टोळी अटकेत

0
35

चंद्रपूर-शहरातील बस स्टँडजवळील पुलावर अडवून बळजबरीने पैसे, मोबाईल हिसकवणार्‍या टोळीला रामनगर गुन्हे अन्वेषण पथकाने अवघ्या काही तासांतच अटक केली. यात ३ युवक व एक महिला आरोपी असून, त्यांचेकडून एकूण ५४ हजार ३00 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
जयदीप दवणे नामक व्यक्ती हे दि. २६ एप्रिल रोजी सकाळी आपल्या भावाच्या लग्नाच्या पत्रिका वाटपास अकोला गेले असता रात्री १0.३0 वाजता परत येताना चंद्रपूर येथील पाण्याच्या टाकीजवळ उतरले. तिथून बस स्थानकाकडे पायदळ जात असताना बस स्टॉप चौकात मागून कथ्या रंगाच्या ज्युपिटर मोपेडवर अज्ञात तीन इसम व एक महिला आले व रस्ता अडवून गाडीवर बस म्हणत जबरदस्ती पकडून खिशातील रोख रक्कम ८ हजार रुपये, मोबाईलची पॉवर बँक व मोबाईल चाजिर्ंग केबल हिसकावून पळून गेल्याची अशी तक्रार रामनगर पोलिस ठाण्यात दाखल केली.
रामनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून गुन्ह्याचा तपास सुरू केला. पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे पोऊनी विनोद भुरले व पथक यांनी अवघ्या काही तासांतच आरोपी विजय ऊर्फ पप्पू मनीष शेट्टी वय १९ वर्ष, शुभम सुधाकर रामटेके वय २५ वर्ष दोघेही राहणार शामनगर, चंद्रपूर, दिपक राजू भोले वय १९ वर्ष रा. शांतीनगर, बंगाली कॅम्प, चंद्रपूर व एक महिला आरोपीला अटक करण्यात आली. आरोपींकडून ३२00 रुपये, मोबाईल पॉवर बँक, डेटा केबल व गुन्हयात वापरलेली ज्युपिटर मोपेड दुचाकी वाहन असा एकूण ५४ हजार ३00 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक, चंद्रपूर, अपर पोलिस अधीक्षक सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेश मुळे, मपोनि लता वाढीवे, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि मधुकर सामलवार, पो. हवा. रजनीकांत पुट्ठावार, प्रशांत शेंदरे, विनोद यादव, किशारे वैरागडे, चिकाटे, मिलिंद दोडके, मुडे, सतीश अवथरे, लालू यादव आदींनी केली.