गोरेगाव.,दि.28ः तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा निंबा येथे 27 /4 2023 ला शाळा पूर्वतयारी अभियान मेळाव्याचे आयोजन सरपंच श्रीमती वर्षाताई विजय पटले यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडले.कार्यक्रमाचे उ्घाटक म्हणून पंचायत समिती सदस्य रमेशभाऊ पंधरे होते.यावेळी ग्रामपंचायत सदस्य संजू सहारे, आर.एच नंदेश्वर मुख्याध्यापक जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा निंबा उपस्थित होते.शाळा पूर्व तयारी मेळाव्याला मार्गदर्शन करतांना सरपंच वर्षाताई पटले म्हणाल्या की, शैक्षणिक वर्ष सन 2022 2023 मध्ये पहिलीला दाखल पात्र बालकांसाठी शाळा पूर्वतयारी अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे.इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या सर्व मुलांना शाळा पूर्व तयारीची एक दिशा दाखवायची आहे. माता पालकांची मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी फार मोठी जबाबदारी असते त्यांच्या जडणघटनेतून मुलांवर अनेक संस्कार पेरले जातात. शाळापूर्व तयारी अभियानाचे महत्त्व पटवून मुलांप्रती आपण जागरूक असायला पाहिजे माता पालक प्रशिक्षक एकत्र आल्यास मुलांच्या शारीरिक मानसिक व बौद्धिक विकास घडल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष राजू चनाप, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य रेखाताई शिवणकर ममता सिरसाम, द्वारकाताई कोचे, पुष्पाताई परसगाये आणि अन्य माता पालक संघाच्या सदस्य, उपस्थित होते. सुनिता खरवडे ,शिरवंता परसगाये,छायाताई साखरे अंगणवाडी सेविका यांनी माता पालक गटांना विविध साहित्याद्वारे मार्गदर्शन केले. संचालन राजेंद्र बनसोड सहाय्यक शिक्षक यांनी केले.तसेच आभार भरत कोहरे यांनी मानले. प्रसंगी रूपाली शहारे रत्नकला पंधरे आणि प्रमोद कोटांगले शिक्षण स्वयंसेवकांची मदत मिळाली.





