लालबावटा शेतमजूर संघटनेच्यावतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन

0
13

गोदिया,दि.02– महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनच्या आवाहनवर आज 2 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मागण्याचे मुख्यमंत्र्याच्या नावे असलेले निवेदन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांना देण्यात आले.निवेदनात आवास योजनेंतर्गत मंजूर घराकरिता ६ लाख रुपये मंजूर करण्यात यावे.मनरेगाचे कमी केलेले बजेट वाढवून देत ६०० रुपये मजुरीचे दर लागू करण्यात यावे.वनहक्क जमीन व गायरान जमिनीचे पट्टे देण्यात यावे.रेशन योजनेत नगदी पैसे नको तर शेतमजुराच्या मुली मुलाला मोफत शिक्षण देण्यात यावे.आरोग्याची हमी देत शेतमजूरांना 6 हजार रुपये प्रती व्यक्ती पेंशन लागू करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश होता.यावेळी हौसलाल रहांगडाले,शेखर कनोजिया,प्रल्हाद उके,चरणदास भावे,कल्पना डोंगरे,दुलीचंद कावडे,गुणवंत नाईक,जितेंद्र गजभिये,प्रकाश चौरे आदी उपस्थित होते.