शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने पटेल महाविद्यालय सन्मानित

0
9

आमगाव,-. बहुजन हिताय जगत शिक्षण संस्था गोंदिया द्वारा संचालित हरिहर भाई पटेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चिरचाळबांधला सामाजिक वनीकरण, वनविभाग, महाराष्ट्र राज्याच्या सौजन्याने सोमवारी महाराष्ट्र दिनाच्यानिमित्ताने गोंदिया पोलिस मुख्यालयात संपन्न झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्या हस्ते प्राचार्य बन्सीधर शहारे, माजी प्राचार्य जी.एम. येळे यांना देऊन सन्मानित करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते बन्सीधर शहारे व येळे यांना 30 हजार रूपयांचे धनादेश, स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्राचार्य बन्सीधर शहारे यांनी या पुरस्काराचे खरे मानकरी हरिहर भाई पटेल कनिष्ठ महाविद्यालयातील नवकवी हरीतसेना प्रभारी शिक्षक काकाजी मडावी आणि सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांचे असल्याचे सांगितले. याबद्दल बहुजन हिताय जगत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षणमहर्षी जे.एस. रहांगडाले, सचिव एन.एन. येळे, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त राजेश पांडे, सहआयुक्त,मोहतुरे साहेब, वनविभागाचे अधिकारी पाटील आणि पटेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व कर्मचाऱी बहुजन हिताय जगत शिक्षण संस्थेचे सर्व कर्मचारी, जगत कल्याण शिक्षण संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.