बांदा पोलीसांनी तब्बल 11 लाखाच्या दारूसह 31 लाख 65 हजार 395 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त…

0
15

बांदा :- बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी बांदा पोलिसांनी गुजरात येथील दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 11 लाखाच्या दारूसह तब्बल 31 लाख 65 हजार 395 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास बांदा तपासणी नाक्यावर करण्यात आली.तर प्रदीपकुमार श्रीभगवती प्रसाद. रा.जंगलेश्वर, आझाद चौक, पिंजरा जमात खाना राजकोट, गुजरात, व मोहंमद शबिर वहिदीभाई इंद्राशी. रा.जंगलेश्वर, आझाद चौक, पिंजरा जमात खाना राजकोट,गुजरात अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून असलेला ट्रक जप्त करण्यात यश आले आहे.

याबाबतची तक्रार बांदा पोलीस हवालदार प्रसाद पंडित पाटील यांनी दिली आहे. त्यानुसार त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबाबतची अधिक माहिती अशी की, सावंतवाडीकडे बेकायचा दारू मोठ्या प्रमाणात वाहतूक होणार असल्याची, माहिती मिळाली होती. त्यानुसार बांदा पोलिसांनी येथील तपासणी नाक्यावर सापळा रचला त्यावेळी या गाडीत तब्बल २० लाख रुपयाचा ट्रक सह 11 लाखाची दारू मिळून आली आहे.

मिळाला माल ➖ 1) 5,70,240/- रुपये किमतीचे 528 बॉटल,ROYAL STAG BARREL SELECT असे इंग्रजी लेबल असलेल्या 750 मिलि मापाच्या गोवा बनावटीच्या एकूण 528 काचेच्या बाटल्या.

2)105300/-रुपये किमतीच्या BLENDERS PRIDS PREMIUM WHISKY असे इंग्रजी लेबल असलेल्या 750 मी. ली मापाच्या 54 काचेच्या बाटल्या.

3)73440/-रुपये किमतीचे MAGIK MOMENT ORANGE FLAVOURD VODKA असे इंग्रजी लेबल असलेल्या 750मिली मापाच्या 72 बॉटल

4)58320/-रुपये किमतीच्या BLUE RIBAND PREMIUM EXTRA DRY GIN असे इंग्रजी लेबल असलेल्या 750 मी. ली मापाच्या 72 काचेच्या बाटल्या.

5)57000/-रुपये किमतीच्या VAT 69 BLENDED SCOTCH WHISKY असे इंग्रजी लेबल असलेल्या 180 मी. ली मापाच्या 100 प्लॅस्टिक बाटल्या.

6)74250/-रुपये किमतीच्या BLENDERS PRIDS PREMIUM WHISKYअसे इंग्रजी लेबल असलेल्या 60 मी. ली मापाच्या 450 काचेच्या बाटल्या.

7)140400/-रुपये किमतीच्या ROYAL CHALLENGE FINEST PREMIUM WHISKYअसे इंग्रजी लेबल असलेल्या 750 मी. ली मापाच्या 156 काचेच्या बॉटल

8)64800/-रुपये किमतीच्या SMIRNOFF ORANGE TRIPLE DISTILLED असे इंग्रजी लेबल असलेल्या 180मी. ली मापाच्या 135 प्लॅस्टिक बॉटल

9)21645/-रुपये किमतीच्या BAGPIPER CLASSIC WHISKY असे इंग्रजी लेबल असलेल्या 750 मी. ली मापाच्या 37 प्लॅस्टिक बॉटल

10) 2000000/-रुपये किमतीची अशोक लेलँड कंपनी चां 12 चाकी लाल रंगाचा ट्रक ओपन हौदा असलेल्या त्याच्या हौद्याचा रंग फिकट चॉकलेटी असून त्यांचे पुढे व मागे GJ.12.AY.1932 असा नंबर असलेला जुना वापरता किं.सु.

एकूण मुद्देमाल ➖ 31 लाख 65 हजार 395.रूपये