35.7 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home रोजगार/व्यापार ‘शासन आपल्या दारी’ अभियानात ४ हजार ८०० बांधकाम कामगारांना लाभ

‘शासन आपल्या दारी’ अभियानात ४ हजार ८०० बांधकाम कामगारांना लाभ

0
48

blank

  • डीबीटीद्वारे ४० लाख खात्यात जमा
  • कामगार विभागाच्या १४ योजनांचा समावेश

        गोंदिया, दि.5 :-  महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ गोंदिया कार्यालयातर्फे “शासन आपल्या दारी” अभियानांतर्गत कामगार कल्याण मंडळाच्या १४ विविध योजनेच्या ४ हजार ८०६ बांधकाम कामगारांना लाभ देण्यात आला असून ३९ लाख ८४ हजार रुपये डीबीटीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान शासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे. सहायक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ कामगारांना देण्याचे नियोजन या कार्यालयाने केले असून याचा हजारो कामगारांना लाभ होतो आहे.

         या योजनेअंतर्गत नोंदित लाभार्थी बांधकाम कामगारांच्या दोन पाल्यांना इयत्ता पहिली ते सातवी साठी प्रतिवर्षी 2500 आणि इयत्ता आठवी ते दहावी साठी 5000 रुपये शैक्षणिक आर्थिक सहाय्य, अशा एकूण 226 निश्चित केलेल्या लाभार्थ्यांना 7 लाख 80 हजार रुपये लाभ देण्यात आलेला आहे.

        नोंदीत लाभार्थी कामगारांच्या दोन पाल्यांना इयत्ता दहावी व बारावी मध्ये किमान 50 टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास 10 हजार रुपये प्रोत्साहनात्मक शैक्षणिक सहाय्य म्हणून 11 लाभार्थ्यांना 1 लाख 10 हजार रुपये, नोंदीत लाभार्थी कामगारांच्या दोन पाल्यांना इयत्ता अकरावी व बारावी च्या शिक्षणासाठी प्रती शैक्षणिक वर्षी 10 हजार रुपये शैक्षणिक सहाय्य म्हणून 63 लाभार्थींना 6 लाख 30 हजार रुपये, नोंदीत लाभार्थी कामगारांच्या दोन पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेश, पुस्तके व शैक्षणिक सामुग्रीसाठी प्रतिवर्षी 20 हजार रुपये शैक्षणिक सहाय्य म्हणून 41 लाभार्थ्यांना 8 लाख 20 हजार रुपये देण्यात आलेले आहे.

        नोंदीत लाभार्थी कामगारांच्या दोन पाल्यांना अथवा पुरुष कामगारांच्या पत्नीस वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयात किंवा संस्थेत प्रवेश घेण्यासाठी, पुस्तके व शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी प्रती शैक्षणिक वर्षी वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरीता 1 लाख रुपये व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरीता 60 हजार रुपये शैक्षणिक सहाय्य म्हणून 5 लाभार्थ्यांना 3 लाख रुपये, नोंदीत लाभार्थी कामगारांच्या दोन पाल्यांना, शासनमान्य पदवीकेमध्ये शिक्षण घेत असलेल्या पाल्यास प्रती शैक्षणिक वर्षी 20 हजार रुपये आणि पदव्युत्तर पदविका मध्ये शिक्षण घेत असलेल्या प्रती शैक्षणिक वर्षी 25 हजार रुपये शैक्षणिक सहाय्य म्हणून 39 लाभार्थ्यांना 8 लाख 30 हजार रुपये देण्यात आलेले आहे.

        संगणकाचे शिक्षण (MS-CIT) घेत असलेल्या नोंदीत लाभार्थी कामगारांच्या दोन पाल्यांना शुल्काची परिपूर्ती तथापी MS-CIT उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यास सदर शुल्काची प्रतिपूर्ती करण्यात यावी म्हणून एका लाभार्थ्याला 5 हजार रुपये, नोंदीत लाभार्थी स्त्री बांधकाम कामगारास तसेच नोंदीत पुरुष लाभार्थी बांधकाम बांधकाम कामगारांच्या पत्नीस दोन जिवित अपत्यांपैकी नैसर्गिक प्रसुतीसाठी 15 हजार रुपये व शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी 20 हजार रुपये आर्थिक सहाय्य म्हणून 6 लाभार्थ्यांना 1 लाख 15 हजार रुपये देण्यात आलेले आहे.

        नोंदीत लाभार्थी कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या नामनिर्देशित केलेल्या वारसास 10 हजार रुपये अंत्यविधीसाठी मदत म्हणून एका लाभार्थ्याला 10 हजार रुपये, नोंदीत लाभार्थी कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नी अथवा स्त्री कामगारांचे विधुर पतीस प्रतीवर्षी 24 हजार रुपये आर्थिक सहाय्य म्हणून 5 लाभार्थ्यांना 1 लाख 20 हजार रुपये, नोंदीत लाभार्थी बांधकाम कामगाराच्या स्वत:च्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपुर्तीसाठी 30 हजार रुपये अर्थसहाय्य म्हणून 2 लाभार्थ्यांना 60 हजार रुपये, नोंदीत लाभार्थी बांधकाम कामगाराच्या मुलीच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपुर्तीसाठी 51 हजार रुपये अर्थसहाय्य म्हणून 4 लाभार्थ्यांना 2 लाख 4 हजार रुपये देण्यात आलेले आहे. तसेच नोंदीत बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी योजनेअंतर्गत 3735 कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली व असंघटीत कामगारांकरीता ई-श्रम नोंदणी अंतर्गत 667 कामगारांची ई-श्रम नोंदणी करण्यात आलेली आहे. अशी माहिती सहाय्यक कामगार आयुक्त उज्ज्वल लोया यांनी दिलेली आहे.

blank