29.8 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home विदर्भ विविध कार्यक्रमांनी साजरा झाला पर्यावरण जनजागृती सप्ताह

विविध कार्यक्रमांनी साजरा झाला पर्यावरण जनजागृती सप्ताह

0
49

blank

तिरोडा,दि.13ः जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अदानी पावर प्लांट तिरोडाच्या वतीने प्लास्टिक प्रदूषणावर उपाययोजना या संकल्पनेसह 5 ते 10 जून या सप्ताह दरम्यान तिरोडा परिसरात विविध जनजागृती पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या सप्ताहात प्लास्टिक प्रदूषणावर उपाय योजना या विषयावर आधारित स्लोगन, पोस्टर, चित्रकला, प्रश्नमंजुषा आणि पर्यावरण विषयक स्पर्धा कर्मचारी कामगार आणि लगतच्या गावांमधील विद्यार्थ्या करिता घेण्यात आल्या.सप्ताहाची सुरुवात अदानी पावर प्रमुख कांती बिश्वास यांच्या मार्गदर्शनाखाली हरित रॅली काढून शांतीग्राम अदानी टाउनशिप मध्ये वृक्षारोपण करून झाली.

सप्ताह अंतर्गत डॉ.राजेश बेनिवाल, डॉ.प्रवीण जानी, डॉ.अविनाश जैन यांची प्लास्टिक प्रदूषणावरील उपाय , फ्लाय आँश चा उपयोग व वापर जसे जंगल शेती व इतर या विषयावर जनजागृती पर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या मार्गदर्शनाचा लाभ प्रामुख्याने कर्मचारी गावातील प्रगतशील शेतकरी लगतच्या गावातील ग्रामपंचायतचे पदाधिकारी व नागरिक यांनी घेतला.अदानी ग्रुपच्या वर्ष 2030 पर्यंत 100 मिलियन वृक्ष लागवड या उपक्रमा अंतर्गत टाऊनशिप तसेच प्लांट परिसरात 500 झाडे लावण्यात आली.

सप्ताहाच्या समारोपीय तसेच बक्षीस वितरण समारंभाला प्रामुख्याने अदानी पावरचे ऑपरेशन हेड संजय रांगणेकर, एच.आर हेड  संजय अरगडे तसेच अदानी पावरचे श्रीराम पिंपलिकर, डॉ.विजय गांधेवार व पर्यावरण विभाग प्रमुख ए.पी.सिंग,राजेंद्र मुरइ, शशिकांत बोधनकर उपस्थित होते. यावेळी सप्ताह अंतर्गत आयोजित विविध स्पर्धांच्या विजेत्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन प्रवीण शहा तर आभार प्रदर्शन राहुल शेजव यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी पर्यावरण विभाग व अदानी फाउंडेशनच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.