36 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता गंगाझरी हद्दीत घरफोडी करणाऱ्यास रोख रक्कम 51,000/- रुपयासह अटक

गंगाझरी हद्दीत घरफोडी करणाऱ्यास रोख रक्कम 51,000/- रुपयासह अटक

0
51

blank

गोंदिया,दि.24-गंगाझरी पोलीस ठाण अंतर्गत यत असलल्या सोनेगाव खुर्द यथील अजयकुमार देवचंद पारधी फिर्यादीच्या घरातून 15/06/2023 चे 11.30 वा. ते दिनांक 16/06/2023 चे 05. 30 वा. दरम्यान बाहेरगावी डयुटीवर गेले होते.तर त्यांची पत्नी व मुले अंगणात झोपले असताना अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी व साक्षदार यांचे घराचे मागील दरवाज्याची कडी कोयंडा उचकटुन घरातील बेडरुम मधील लोखंडी आलमारीतील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम एकूण किमती – 3,65,000 /- रुपयांचा मुद्देमाल माल तसेच साक्षदार यांचे घरातील बेडरुममधील लाकडी संदुकमधील सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कम किंमती एकुन 1,47,450/ – रु. असा दोन्ही घरातील मिळुन एकूण किंमती 5,12,650/- रुपयांचा मुद्देमाल चोरून नेले.याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन पोलीस ठाणे गंगाझरी येथे अपराध क्र. 193/2023 कलम 457, 380 भारतीय दंड विधान अन्वये दाखल करण्यात आले होता.

पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी, तिरोडा यांनी सदरचे घरफोडी गुन्ह्यांचे अनुषंगाने सर्व ठाणेदार गोंदिया जिल्हा, ठाणेदार गंगाझरी, तसेच स्थानिक गुन्हे शाखा यांना नमूद गुन्ह्यातील अज्ञात चोरट्या चा शोध घेऊन तात्काळ गुन्हा उघड करण्याच्या निर्देश सूचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस ठाणे गंगाझरीचे पो.नि.महेश बनसोडे यांचे मार्गदर्शनात गंगाझरी पो. स्टाफ तसेच स्थानिक गुन्हे शाखा पो.नि. दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनात स्था. गु.शा. पोलीस पथकाद्वारे घरफोडी गुन्ह्यांतील अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यात येत होता. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस पथक , आणि पो.ठाणे गंगाझरी पोलीस पथक गुन्हेगारांचा शोध घेत असताना पथका तील पोलीस अधिकारी अंमलदाराना गोपनिय बातमीदार आणि तांत्रिक माहिती मिळाली की , घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार श्याम सिद्धीलाल धूर्वे, वय 36 वर्षे रा. चांदपुर, तालुका तुमसर जिल्हा – भंडारा याने घरफोडी केली आहे.

अश्या प्राप्त गोपनीय माहिती व तांत्रिक माहिती च्या आधारे सराईत घरफोडी गुन्हेगार नामे श्याम सिद्धीलाल धूर्वे, वय 36 वर्षे रा. चांदपुर, तालुका , तुमसर जिल्हा – भंडारा यास त्याचे राहते पत्ता चांदपुर येथून ताब्यात घेण्यात आले. नमूद गुन्हेगार यास घरफोडी गुन्ह्यांतील चोरीस गेलेल्या मुद्देमाल बाबत विचारपूस व कसून चौकशी केली असता सराईत गुन्हेगार श्याम धूर्वे यांनी घरफोडी केल्याची कबुली देवून गुन्हा केल्याचे सांगितले. त्यांचे ताब्यातून गुन्ह्यात चोरी केलेली रोख रक्कम 51,000/- रुपये हस्तगत करण्यात आले असून गुन्ह्यांतील सोन्या चांदीच्या दगिण्याबाबत सखोल चौकशी व तपास सुरु आहे.सदर गुन्हयाचा अधिकचा तपास पोलीस निरीक्षक महेश बनसोडे,यांचे मार्गदर्शनात पो.उप.नि.पराग उल्लेवार, पो.ठाणे गंगाझरी हे करीत आहेत.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा उघड करण्याची उत्कृष्ठ कामगिरी पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, स्था.गु.शा. गंगाझरी पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांचे मार्गदर्शनात स.पो.नि विजय शिंदे,पोपट टिळेकर पो.उप.नि.पराग उल्लेवार, महेश विघ्नें, स.फौ.अर्जुन कावडे, पो.हवा. राजेंद्र मिश्रा, महेश मेहर , भूवनलाल देशमुख, इंद्रजित विसेन, चापोशि. कुंभलवार यांनी केलेली आहे.

blank