35.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home क्रीडा चंद्रपूर येथे आयोजित बॅडमिंटन स्पर्धेमध्ये गडचिरोली येथील टायटन ग्रुपचे दुहेरी लढतीत प्रथम...

चंद्रपूर येथे आयोजित बॅडमिंटन स्पर्धेमध्ये गडचिरोली येथील टायटन ग्रुपचे दुहेरी लढतीत प्रथम स्थान

0
19

blank

प्रथम विजेते प्रशांत लाकडे यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव

गडचिरोली: महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन व चंद्रपूर जिल्हा बॅडमिंटन डेव्हलपमेंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे दि. 01 व 2 जुलै 2023 रोजी सुरजमल चांडक मेमोरिअल चंद्रपूर लीग बॅडमिंटन टुर्नामेंट 2023 या दोन दिवशीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर स्पर्धेत चंद्रपूर, गडचिरोली व लगतच्या जिल्हयातील वेगवेगळया वयोगटाकरिता 100 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेत गडचिरोली येथील टायटन गु्रपने दुहेरी लढतीत प्रथम प्राविण्य प्राप्त केले यामध्ये स्वराज कला व क्रीडा मंडळ, गडचिरोलीचे सदस्य तथा गडचिरोली तंत्रनिकेतन येथे कार्यरत कर्मचारी स्पर्धक प्रशांत लाकडे व चंद्रपूर येथील स्पर्धक लक्ष्मीकांत आर.के. यांच्या जोडीने प्रथम क्रमांक पटकावला.
सामाजिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारी संस्था समस्त सक्षमिकरण बहुउद्देशिय विकास संस्थेचे प्रशांत लाकडे हे सक्रीय सदस्य आहेत. संस्थेच्या वतीने नुकत्याच गडचिरोली येथे शालेय विद्याथ्र्यांकरिता घेण्यात आलेल्या बॅटमिंटन प्रशिक्षण शिबीर व स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामध्ये त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. सामाजिक जाणिवेतुन विविध उपक्रमात विशेषतः विद्याथ्र्यांशी निगडित असणारे शैक्षणिक कार्य व खेळांमध्ये ते हिरीरेने सहभाग दर्शवितात. विद्याथ्र्यांनी शैक्षणिक जीवनात खेळाला मित्र बनविले तर अभ्यासामध्ये त्यांना उत्साहाने परीश्रम घेता येवून अभ्यासातील चढ उतार अनुभवातून नरौश्यामध्ये खंबीरपणे मात करता येवून प्रगतीच्या वाटा मजबुत करता येवू शकतील तसेच इतर कुठलेही वाईट व्यसन जे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य खराब करण्यास कारणीभुत असतात ते टाळण्याचे सामस्थ्र्य खेळातुन निर्माण होवू शकते अशी त्यांची भावना आहे.
प्रशांत लाकडे यांच्या यशाबद्दल समस्त सक्षमिकरण बहुउद्देशिय विकास संस्थेच्या अध्यक्षा अ‍ॅड. भावना लाकडे, उपाध्यक्ष महेन्द्र वानखेडे, सचिव किर्तीकुमार खोब्रागडे तसेच सदस्य तथा गडचिरोली शासकीय तंत्र निकेतन शिक्षक, अधिकारी, कर्मचारीवृंद तसेच स्वराज कला व क्रीडा मंडळ, गडचिरोलीचे पदाधिकारी, सदस्यांनी अभिनंदन व्यक्त केले आहे.

blank