41.3 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home विदर्भ एकोडी येथे कृषी महिला शेतकरी सन्मान दिन कार्यक्रम साजरा

एकोडी येथे कृषी महिला शेतकरी सन्मान दिन कार्यक्रम साजरा

0
27

blank

 गोंदिया, दि.12 :- ग्रामपंचायत कार्यालय एकोडी ता.गोंदिया येथे कृषि संजीवनी सप्ताह अंतर्गत कृषी महिला शेतकरी सन्मान दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शेतीमधील छोटे छोटे तंत्रज्ञान वापरून आपण कसे उत्पन्न वाढवावे तसेच कृषी विषयक विविध योजना जसे- पी.एम. किसान, यांत्रिकीकरण, शेतकरी अपघात विमा, पीएमएफएमई अंतर्गत उद्योग कसा  सुरू करावा, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, महाडिबीटी, एमआरईजीएस याबाबत सविस्तर माहिती तसेच श्री पद्धत, पट्टा पद्धत, जिवामृत, बिजामृत तयार करणे व त्याचे भात शेतीमधील वापराचे महत्व याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सर्व शेतकऱ्यांनी सामाईक सुविधा केंद्रावर जाऊन 1 रुपयात पीक विमा काढावा, याची मुदत 31 जुलै 2023 पर्यंत आहे अशी यावेळी माहिती देण्यात आली.

         कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका कृषी अधिकारी आर.टी.पवार, कृषी पर्यवेक्षक दासगाव-1 श्री. तुरकर व कृषी पर्यवेक्षक दासगाव-2 श्री. मेंढे, सरपंच एकोडी शालु चौधरी, उपसरपंच वर्षा अंबुले, जि.प.सदस्य अश्विनी पटले तसेच एकोडी गावातील महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषी सहायक एकोडी डी.झेड.डहाके यांनी केले.