38.6 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home विदर्भ जागरुक राहून झुनोटीक आजारावर निंयत्रण मिळवु या…जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे

जागरुक राहून झुनोटीक आजारावर निंयत्रण मिळवु या…जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे

0
65

blank

 एक जग, एक आरोग्य: झुनोसिस थांबवा ! 

गोंदिया- प्रत्येक वर्षी ६ जुलै रोजी झुनोटिक संसर्ग किंवा प्राण्यांमुळे पसरणारे रोग याबद्दल सामान्य लोकांमध्ये जागरूकता पसरवणे आणि त्यांना प्रतिबंध आणि उपचार करणे, त्यावर चर्चा करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे या उद्देशाने जागतिक प्राणी दिवस साजरा केला जात आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात 06 जुलै – 13 जुलै जागतिक झूनोसेस सप्ताह साजरा होत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी दिली आहे.
     यावर्षी हा दिवस एक जग, एक आरोग्य: झुनोसिस थांबवा !  याला समर्पित आहे. थीम साजरी केली जात असल्याचे डॉ.नितीन वानखेडे यांनी म्हटले आहे.
दि. 10 जुलै रोजी झुनोसिस आजाराबाबत कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. झूनोसेस आजाराबाबत विविध जनजागृती साधनांचे उदघाटन जिल्हाधिकारी मा. चिन्मय गोतमारे यांच्या हस्ते करण्यात आले. नागरिकांनी घाबरुन न जाता पाळीव प्रांण्याचे नियमित लसीकरण करुन घेणे व त्यांची स्वच्छता ठेवणे, झुनोटिक संसर्ग किंवा प्राण्यांमुळे पसरणारे रोग याबद्दल गैरसमज न करता प्रशिक्षित डॉक्टराकडुन माहिती घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचार करुन घेण्याचे आवाहन ह्या वेळी केले.
ह्यावेळी उदघाटन जिल्हास्तरीय समिती सभेला जागतिक आरोग्य संघटना नागपुर विभागाचे सर्वेक्षण वैद्यकिय अधिकारी डॉ. साजिद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार ,शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे सहाय्यक अधिष्ठाता डॉ. मनिष तिवारी, जिल्हा महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी संजय गणविर ,जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. नितीन कापसे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.डी.बी. जयस्वाल, जिल्हा साथरोग तज्ञ डॉ. सुशांकी कापसे, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाचे कैलास गजभिये,जिल्हा आय.ई.सी अधिकारी प्रशांत खरात, सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्रीमती आर.पी. मिश्रा तसेच डॉ. स्वाती घोडमारे,डॉ. विजय राऊत,डॉ. अमित कोडनकर,डॉ. ललित कुकडे, डॉ.विनोद चव्हाण,डॉ. प्रेमकुमार बघेले,डॉ. सलील पाटील ई. तालुका आरोग्य अधिकारी व सर्व ग्रामीण रुग़्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, अशासकिय संस्थेचे अधिकारी उपस्थित होते.
त्या अनुषंगाने जिल्ह्यात झूनोसेस आजाराबाबत विविध उपक्रम राबवुन लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. रेबीज विरुद्धच्या पहिल्या लसीकरणाच्या स्मरणार्थ 06 जुलै रोजी 2007 मध्ये पहिल्यांदा जागतिक प्राणी दिवस साजरा करण्यात आला. 2007 पासून हा दिवस दरवर्षी झुनोटीक रोगांबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी, सार्वजनिक, धोरण निर्माते आणि आरोग्य सेवा व्यावसायिकांना झुनोटीक रोग, त्यांचे प्रतिबंध आणि नियंत्रण उपाय, उदयोन्मुख झुनोटीक रोगांबद्दल शिक्षित करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करण्यासाठी पाळला जातो, पाळत ठेवणे, संशोधन आणि सज्जतेस प्रोत्साहन देणे हा आहे. संसर्गजन्य रोग शोधणे आणि त्यांना प्रतिसाद देणे आणि मानवी आरोग्य, पशु आरोग्य आणि पर्यावरणीय क्षेत्रांमधील सहकार्याला प्रोत्साहन देणे. या निमित्ताने जगभरातील सरकारी व निम सरकारी आरोग्य संस्था आणि पशुवैद्यकीय संघटना मार्फत जनजागृती मोहीम, शैक्षणिक उपक्रम, विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात असल्याची माहिती जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल यांनी दिली आहे.
गेल्या दशकात, जगभरातील प्राण्यांमुळे होणारे आणि पसरणारे रोग आणि संसर्गाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. असा अंदाज आहे की जगभरात दरवर्षी झुनोटीक रोगांची सुमारे एक अब्ज अधिक किंवा कमी गंभीर प्रकरणे आढळतात. त्याचप्रमाणे दरवर्षी लाखो मृत्यूही त्यांच्यामुळे होतात. गेल्या काही दशकांमध्ये नवीन प्रकारच्या झुनोटीक संसर्गाचा उदय आणि त्याची झपाट्याने पसरण्याची क्षमता यामुळे जागतिक आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने ते गंभीर चिंतेचा विषय मानले जात आहेत. जागतिक झुनोसिस दिवस दरवर्षी 6 जुलै रोजी झुनोटीक किंवा झुनोस संक्रमणाबद्दल लोकांमध्ये माहिती आणि जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने साजरा केला जात असल्याची माहिती जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंनन अग्रवाल यांनी दिली आहे.
झुनोटीक रोग म्हणजे काय- झुनोटीक संसर्ग किंवा रोग हे असे रोग आहेत जे प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरू शकतात. त्याच वेळी काही विशिष्ट परिस्थितीमध्ये संसर्ग मनुष्यांपासून प्राण्यांमध्ये देखील पसरू शकतो. अशा स्थितीला रिवर्स झुनोसिस म्हणतात. झुनोटीक संसर्ग संक्रमित प्राण्याची लाळ, रक्त, मूत्र, श्लेष्मा, विष्ठा किंवा शरीरातील इतर द्रव्यांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्काने मानवामध्ये पसरू शकतो. या प्रकारच्या रोगांमध्ये किटकजन्य आजार देखील आढळतात. जे टिक्स,डास किंवा पिसू यांच्याद्वारे पसरतात. झुनोटीक रोग जिवाणू, विषाणू, बुरशी किंवा परजीवी यांच्यामुळे होऊ शकतात. जे कधी कधी मानवांमध्ये गंभीर आणि अगदी घातक परिणाम देखील दर्शवू शकतात. सध्या जगभरात 200 हून अधिक ज्ञात झुनोटीक रोग आहेत.भारतात झुनोटीक रोगांची प्रकरणे सर्वात जास्त दिसतात ती म्हणजे रेबीज, खरुज, ब्रुसेलोसिस, स्वाइन फ्लू,  इबोला, एंन्सेफलायटिस, बर्ड-फ्लू, निपाह, ग्लॅडर्स, सेलमोनोलोसिस, मंकी फीवर/ मंकी पॉक्स, प्लेग, हिपॅटायटिस ई,झिंका व्हायरस, सार्स रोग आणि रिंग वर्म इत्यादींचा समावेश असल्याचे डॉ.नितीन वानखेडे यांनी म्हटले आहे.