33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home रोजगार/व्यापार ‘कौशल्याची मागणी’ सर्व्हेक्षण मोहीम 31 जुलै पर्यंत

‘कौशल्याची मागणी’ सर्व्हेक्षण मोहीम 31 जुलै पर्यंत

0
30

  गोंदिया, दि.13:- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (MSSDS), राज्यामध्ये कौशल्य विकास उपक्रमांची अंमलबजावणी व संनियंत्रण करणारी नोडल एजन्सी म्हणून कार्यरत आहे.  MSSDS मार्फत केंद्र व राज्य शासन पुरस्कृत विविध कौशल्य विकास प्रशिक्षण योजना राबविण्यात येतात.  प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान व किमान कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम यासह केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी याकरीता राज्यातील युवक-युवतींना आवश्यक असलेले आणि त्यांनी मागणी केलेले कौशल्य प्रशिक्षण प्रदान केल्यास उमेदवारांच्या प्रशिक्षणादरम्यान स्वारस्यामध्ये वृद्धी होऊन अनुपस्थितीचे प्रमाण कमी होईल आणि प्रशिक्षणामध्ये यशस्वी उमेदवारांना रोजगार-स्वयंरोजगाराच्या अधिक प्रमाणात संधी उपलब्ध होतील. यासाठी राज्यातील युवक-युवतींना उद्योगांच्या मागणीवर आधारित कौशल्य प्रशिक्षण पुरविण्यासाठी दिनांक 1 जुलै ते 31 जुलै 2023 दरम्यान “कौशल्याची मागणी सर्व्हेक्षण” मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी गुगल फॉर्म लिंक https://forms.gle/kYtSxbVhrZ2s7z6q8 अशी आहे.

         सदर फॉर्म जिल्ह्यातील शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विविध शाखेतील विद्यार्थी, शालेय/ महाविद्यालयीन शिक्षणातून गळती झालेले/ शिक्षण सोडलेले/ नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार तथापि, समाजातील वंचित घटकातील उमेदवारांनी नोंदणी करावी.

        याबाबत अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत, दुसरा माळा, रुम नं. 210, आमगाव रोड, गोंदिया येथे प्रत्यक्ष भेटावे अथवा दुरध्वनी क्रमांक 07182-299150 यावर संपर्क साधावा. असे आवाहन कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त राजु माटे यांनी केले आहे.

उद्योगांच्या मनुष्यबळामध्ये कौशल्याची आवश्यकता’ नोंदणी मोहीम 31 जुलै पर्यंत

 गोंदिया, दि.13 :- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (MSSDS), राज्यामध्ये कौशल्य विकास उपक्रमांची अंमलबजावणी व संनियंत्रण करणारी नोडल एजन्सी म्हणून कार्यरत आहे.  MSSDS मार्फत केंद्र व राज्य शासन पुरस्कृत विविध कौशल्य विकास प्रशिक्षण योजना राबविण्यात येतात.  प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान व किमान कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम यासह केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी याकरीता राज्यातील युवक-युवतींना आवश्यक असलेले आणि त्यांनी मागणी केलेले कौशल्य प्रशिक्षण प्रदान केल्यास उमेदवारांच्या प्रशिक्षणादरम्यान स्वारस्यामध्ये वृद्धी होईल आणि प्रशिक्षणामध्ये यशस्वी उमेदवारांना रोजगार-स्वयंरोजगाराच्या अधिक प्रमाणात संधी उपलब्ध होतील. यासाठी उत्पादन व सेवा क्षेत्रातील सुक्ष्म, लघु आणि मोठ्या उद्योग कार्यान्वित आहेत.  सदर उद्योगांमध्ये कुशल, अर्धकुशल व अकुशल अशा विविध प्रकारच्या जॉबरोल निहाय आवश्यक असलेल्या कौशल्याची गरज नोंदविल्यास त्या कौशल्यांच्या अभ्यासक्रमांचा समावेश कौशल्य प्रशिक्षणामध्ये करणे शक्य होईल. यासाठी सर्व उद्योगांची “उद्योगांच्या मनुष्यबळामध्ये कौशल्याची आवश्यकता नोंदणी मोहीम दिनांक 1 जुलै ते 31 जुलै 2023 दरम्यान आयोजित करण्यात येत आहे. यासाठी गुगल फार्म लिंक https://forms.gle/3LQGQTayTnk2gZWk9 अशी आहे. तरी आस्थापनांनी सदर फार्म भरुन सहकार्य करावे.

          याबाबत अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत, दुसरा माळा, रुम नं.210, आमगाव रोड, गोंदिया येथे प्रत्यक्ष भेटावे अथवा दुरध्वनी क्रमांक 07182-299150 यावर संपर्क साधावा. असे आवाहन कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त राजु माटे यांनी केले आहे.

blank