महाराष्ट्रातील 175 आमदारांवर गंभीर गुन्हे; देशात 44 टक्के आमदारांवर फौजदारी खटले

0
24

एडीआर-न्यूचा अहवाल
मुंबई–भारतातील सर्व राज्यांच्या विधानसभांमधील सुमारे ४४% आमदारांनी स्वत:वर फौजदारी खटले घोषित केले आहेत. यात महाराष्ट्रातील १७५ आमदरांवर गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) आणि नॅशनल इलेक्शन वॉच (न्यू) यांनी नुकत्याच केलेल्या विश्लेषणात हा दावा करण्यात आला आहे.

एडीआर आणि न्यूच्या विश्लेषणात विद्यमान आमदारांनी निवडणूक लढण्यापूर्वी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांची तपासणी केली. एडीआरने म्हटले आहे की विश्लेषणामध्ये देशातील समाविष्ट सुमारे २८% आमदारांनी (११३६) स्वतःवर गंभीर गुन्हे दाखल असल्याचे सांगितले. यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि महिलांविरोधातील गुन्ह्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात २८४ पैकी जवळपास १७५ (६२ टक्के) आमदरांनी स्वत:वरील गुन्हेगारी खटले जाहीर केले आहेत. दुसरीकडे, राज्यातील ११४ (४० टक्के) आमदारांवर अति गंभीर स्वरूपाचे गुन्हेगारी खटले दाखल आहेत.