
मौदा,दि.17-संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघाच्यावतीने ओबीसी विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेच्या धर्तीवर निवास व भोजनाची एक रकमी रक्कम देण्यासंदर्भातील योजना तात्काळ कार्यान्वित करण्यात यावे या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसिलदारामार्फेत पाठविण्यात आले.हि योजना शासनाने लागू केल्यास ओबीसी समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी फायद्याची होईल,असे निवेदनात म्हटले आहे.निवेदन देतांना जगदिश वाडिभस्मे (तालुकाध्यक्ष-संभाजी ब्रिगेड, मौदा),संजय काणतोडे (जिल्हाध्यक्ष-संभाजी ब्रिगेड, नागपूर),ईश्वर डहाके (तालुकाध्यक्ष-मराठा सेवा संघ, मौदा),संजय भोयर,स्वराज काणतोडे,सचिन कुकडे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.