बेरोजगार तरुणांना डावलून सेवानिवृत्त शिक्षकांना नियुक्ति देणार्‍या शासनाच्या निर्णया विरोधात जिल्ह्यात निदर्शने

0
27

▪️युवा ग्रॅज्युएट फोरम, संविधान मैत्री संघ, सर्वसमाज विचार मंच विविध सामाजिक शैक्षणिक संघटने चे कार्यकर्ते, अभीयोग्यता धारक शामिल

*गोंदिया* असंख्य तरुण आपले कसब पणाला लाऊन डी. एड., बी. एड. च्या माध्यमातून शिक्षण घेतात. तर दुसरीकडे शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या तरुणांच्या स्वप्नात सरकार मात्र विरजन पाडत असल्याचे दिसून येत आहे. या तरुणांची हक्काची संधी हिसकावून जिल्हा परिषदेच्या शाळांवर सेवा निवृत्त शिक्षकांना मानधन तत्वावर नियुक्त करण्याचा सरकारने घेतलेला निर्णय अत्यंत अन्यायकारक असून हा निर्णय रद्द करावा यासाठी तसेच जुलमी शासनाच्या चुकीच्या धोरणाविषयी संविधान मैत्री संघ, युवा ग्रॅज्युएट फोरम, सर्वसमाज विचार मंच तसेच विविध सामाजिक शैक्षणिक संघटनांच्या वतीने एकाच दिवशी एकच वेळेवर गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक तालुका मुख्यालयावर निदर्शने आंदोलन व त्या पश्चात प्राधिकृत अधिकार्‍यांमार्फत शासनास निवेदन देण्यात आले.
निवेदनातून सेवानिवृत्त शिक्षक कर्मचार्‍यांच्या जिल्हा परिषद शाळेत कंत्राटी नेमणुका करण्यात येऊ नये,
पवित्र पोर्टल वर नोंदणी प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी, रिक्त पदांच्या 80 % (55000) शिक्षक पदभरती करण्यात यावी, विभागीय भरती (विभागीय) नियमित गुणवत्ता यादी लावण्याचा शासनाच्या विचाराधीन असल्यास तो निर्णय रद्द करण्यात यावा, केंद्रीय पद्धतीने गुणवत्ता यादी लावण्यात यावी,
प्रतीक्षा यादी लावण्यात यावी, सर्वच प्रवर्गाचे अनुशेष भरून काढण्यात यावा आणि त्या प्रवर्गातील जागा अतिरिक्त असतील त्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा ही मागणी करण्यात आली.
*गोंदिया* (जिल्हा मुख्यालय) येथे प्रशासकीय भवन डॉ आंबेडकर चौक परिसरात भव्य निदर्शने करण्यात आले तसेच जिल्हाधिकारी गोतमारे यांच्या मार्फत शासनास निवेदन देण्यात आले या वेळी अतुल सतदेवे, उमेश कटरे, वसंत गवळी, सुनील भोंगाड़े, रवी भांडारकर, उमेश दमाहे, नितेश उदापुरे, हितेश सिंगन जुड़े, मुकुंद परिहार, निहाल बिसेन, रस्मी येसनसुरे, हंसा बावनकर, आकाश कोल्हे, भेजेंद्र तुरकर, रमा चुटे, मृणाली खांडेकर, तनुजा शेंडे, हीना बोपचे, लता पारधी, रविकांता बिसेन, पंचशीला पानतावणे, शोभा ठाकरे, पंकज ठाकरे, छत्रपाल रहांगडाले, नीलेश बच्क्षेरे, मनीष चावके, नईम शेख, भूपेंद्रकुमार सुर्यवंशी, उमेश पटले, नंदकिशोर पटले, महेशकुमार फुंडे, मुकेश आंबाडारे , विजय पारधी, विनय हिरकने, चित्रसेन गौतम उपस्थित होते, त्याचप्रमाणे इतर तालुका मुख्यालयावर निदर्शने करण्यात आले व तहसीलदारांमार्फ़त निवेदन देण्यात आले. *आमगाव* येथे मुकेश उजवने, खेमराज उईके , नरेंद्र मेश्राम , मुकेश डोंगरे, अमोल राऊत,
*देवरी* येथे राकेश टेंभुर्णीकर, उत्तम बोंबार्डे, मिलिंद गणवीर, अतुल डोंगरे, संदिप गोंडाणे, सतीश रंगारी, अमोल पंचभाई, श्वेता पाचे, *अर्जुनी मोरगांव* येथे अशोक खोब्रागडे, प्रमोद नेवारे, दिलबर रामटेके, विनोद रोकडे, दिलीप मेश्राम, जितेंद्र मेश्राम, राजु मेश्राम, बाळू दुपारे, सुरेश जांभुळकर, बादल राऊत, डी टी. बांबोले, पद्माकर बोरकर, शैलेश तागडे, *गोरेगाव* येथे प्रा. सचिनकुमार नांदगाये, रमेश सिलेवार ,पंकज मेश्राम, मयूर वालदे, अजय वालदे, धर्मराज काळसर्पे, सतिश तांडेकर, पुरुषोत्तम एस. रहांगडाले, लोकचंद तिलकचन्द पटले, डोमेन फुकटकर, मोहनलाल टिळकचन्द बोपचे, नरेंद्र नत्थूजी गजभिये, ओमेशकुमार ठाकूर, नरेश बोरकर, तुषार डोंगरे, आदर्श शहारे, नृपेंद्र हेतराम चौधरी, *सालेकसा* येथे मनोज डोये,राहुल हटवार,राकेश रोकडे,ऊमंग बंसोड,दिलीप ठेकवार आदि प्रामुख्याने उपस्थित होते