सभापती सोनु कुथेची शिक्षणाधिकार्याला स्थायी समितीच्या बैठकीत शिविगाळ

0
220

गोंदिया –जिल्हा परिषदेच्या स्व.वसंतराव नाईक सभागृहात आज बुधवारला झालेल्या स्थायी समितीच्या
बैठकीत कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती रुपेश कुथे यांनी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये हे सांगितलेेले काम करीत नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत शिविगाळ करुन बैठक सोडून निघून गेल्याचे प्रकरण समोर आले.जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहागंडाले यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक सुरु होताच सभापती कुथे यांनी आंतरजिल्हा बदलीत बदलून आलेल्या शिक्षकाचे काम न झाल्याने आक्रमक झाले.तसेच आम्ही सांगितलेले काम व ते काम करा असे जिप अध्यक्ष सांगितल्यानंतरही होत नसल्याचे एकेरी अश्ल्लील शब्दात आवेशात येत बोलताच सभागृहात शांतता पसरली.विशेष म्हणजे सभेचे अध्यक्ष असलेले जि.प.अध्यक्ष रहागंडालेनी सुध्दा सभापती कुथे यांना सांभाळून घेत शांत करण्याएैवजी बघ्याची भूमिका घेत गप्प राहून काही वेळांनी सभा संपवले.तर विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसचे सदस्यही गप्पच राहिल्याचे समोर आले आहे.या घटनेनंतर अधिकारी वर्गात भितीचे वातावरण तयार झाले असून भविष्यातील सभामध्ये जायचे की नाही यावर चर्चा करु लागलेत.

गोंदिया तालुक्यात शिक्षकांची संख्या कमी आहे त्यातच स्वयंसेवकाची नियुक्ती ३हजार मानधनावर करण्यात आली.परंतु गेल्या तीन महिन्यापासून त्याना मानधन मिळालेले नाही.याकरीता गेले दोन महिन्यापासून मी पाटपुरावा करीत होतो मात्र शिक्षणाधिकारी त्याकडे लक्षच देत नसल्याने आज सभागृहात ही भूमिका घ्यावी लागली.

कृषी व पशुसवंर्धन सभापती रुपेश उर्फ सोनू कुथे