
देवरी,दि.२८- राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस काल गुरुवारी (दि.२७)रोजी भागी येथील जिल्हा परिषद प्रथामिक शाळेत देवरी तालुका शिवसेनेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी देवरी तालुका प्रमुख सुनील मिश्रा, शहर प्रमुख राजा भाटिया. महिला आघाडी प्रमुख प्रिती ऊईके. उफतालुका प्रमुख दालचंद मडावी, लुहाग गिरी, विभाग प्रमुख प्रशांत यादव, दीपक बावनथडे, वॉर्ड प्रमुख संजय राऊत, कृष्णा टेंभूरकर, अरमान अली, सागर मिश्रा यांचे सह भागी शाळेतील शिक्षकवृंद हजर होते.
श्री ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या तालुका शाखेच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.