37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Top News मलकापूर हायवेवर लक्झरींची धडक ६ ठार

मलकापूर हायवेवर लक्झरींची धडक ६ ठार

0
32

blank

मलकापूर शहरातील नांदुरा नाक्यावर लक्ष्मी नगर जवळील नॅशनल हायवे क्रमांक सहावर असलेल्या उड्डाण पुलावर भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या दोन लक्झरी बस एकमेकांवर आदळल्या. या अपघातामध्ये एकूण ६ प्रवासी ठार झाले असून ३० प्रवासी गंभीर तर काही किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास दोन्ही बसमध्ये टक्कर झाली. यातील एक लक्झरी बस (एमएच ०८- ९४५८) रॉयल कंपनीची असून दुसरी बस यात्रेकरूंची होती. अमरनाथ यात्रा संपवून ही लक्झरी बस (एमएच २७ बिएक्स ४४६६) हिंगोलीच्या दिशेने जात होती. तर रॉयल कंपनीची बस नागपूरकडून नाशिकच्या दिशेने रवाना होत असल्याची माहिती मिळाली आहे. तीर्थयात्रींच्या बसमधील ५ प्रवासी ठार झाले आहे ,तर १ प्रवासी महिला जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा या ठिकाणी दगावल्याची माहिती समोर येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी सह कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्य सुरू केले. जख्मीनां पोलीसांच्या वाहनाने मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.तर गंभीर जख्मीनां बुलढाणा जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
जिल्हा पोलीस अधिक्षक सुनील कडासने ,अप्पर पोलीस अधिक्षक अशोक थोरात,उपविभागीय पोलिस अधिकारी गवळी सह आदींनी घटनास्थळी व रुग्णालयात भेट देऊन जख्मींची विचारपूस केली.

blank