
भोपाळ:-मध्य प्रदेश सरकारने पोलिस विभागासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या असून, त्याअंतर्गत पोलिस दलात महिलांसाठी 30 टक्के भरती कोटा राखीव ठेवण्यात आला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांचा भोजन आणि पेट्रोल भत्त्यात वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. पोलिस खात्याला पाचवी वेतनश्रेणी देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान भोपाळमध्ये आयोजित पोलीस परिवार संगम कार्यक्रमात सहभागी झाले होते. यामुळे त्यांनी अनेक मोठमोठ्या घोषणा करत पोलीस दलातील 30 टक्के भरती अनिवार्यपणे मुलींची होणार असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री चौहान म्हणाले की, आज पोलीस दलात कार्यरत असलेल्या मुली पूर्ण निष्ठेने जबाबदारी पार पाडून स्वत:ला सिद्ध करण्याचे काम करत आहेत. राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांना पाचवी वेतनश्रेणी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सर्व पोलिस कर्मचार्यांना रोटेशनद्वारे साप्ताहिक सुट्टी सुनिश्चित केली जाईल. पोलिसांसाठी 25 हजार नवीन घरे बांधण्यात येणार आहेत. पोलीस विभागातील हवालदार आणि हेड कॉन्स्टेबल यांचा गणवेश भत्ता वर्षाला 5000 रुपये करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
*मध्य प्रदेश सरकारच्या मोठ्या घोषणा :-
राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांना पाचवी वेतनश्रेणी देण्यात येणार आहे.
45 वर्षांवरील सर्व पोलिसांची दरवर्षी मोफत आरोग्य तपासणी केली जाईल.
*सर्व पोलिस कर्मचार्यांना रोटेशनद्वारे साप्ताहिक सुट्टी सुनिश्चित केली जाईल.
पोलिसांसाठी 25 हजार नवीन घरे बांधण्यात येणार आहेत.
कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबलचा गणवेश भत्ता प्रतिवर्ष 5000 रुपये असेल
*ज्यांच्याकडे सरकारी वाहने नाहीत अशा सर्व पोलीस ठाण्यांमध्ये तैनात असलेल्या कॉन्स्टेबलपासून ते उपनिरीक्षकापर्यंतच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना महिन्याला 15 लिटर पेट्रोल भत्ता दिला जाईल.
मोफत भोजन भत्त्याचा दर प्रतिदिन 100 रुपये असेल.
*पोलिस कर्मचाऱ्यांचा पोषण आहार भत्ता दरमहा 1000 हजार रुपये करण्यात येणार आहे.
SAF जवानांना दरमहा 1000 रुपये SAF भत्ताही दिला जाईल.





