विकासाची गंगोत्री असीच सुरू राहणार :– ईंजी.राजकुमार बडोले

0
27

( बोरटोला,चान्ना,बोंडगावदेवी येथे विकास कामांचे भूमिपूजन)
अर्जुनी मोर. ( सुरेंद्रकुमार ठवरे)- अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्र हा वैभव संपन्न आहे. अनेक तीर्थक्षेत्राने व्याप्त असलेल्या या क्षेत्रात धार्मिकतेचा सुगंध सदैव दरवडत असतो. तालुक्यात नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानासह प्रतापगड तिर्थक्षेत्र,बोंडगावदेवी तिर्थक्षेत्र नावारुपाला आलेली आहेत. त्यामुळे तिर्थक्षेत्र स्थळांचा विकास हे आपले प्रथम प्राधान्य आहे.सोबतच या क्षेत्राला नैसर्गिक सौंदर्य सुध्दा लाभलेले आहे.पर्यटन स्थळांचा विकास सुध्दा आपले लक्ष आहे.सन 2009 ते 2019 पर्यंत आपन आमदार व मंत्री असतांना सर्वाधिक निधी या विधानसभाक्षेत्रात आणुन सर्वांगीण विकास केला.प्रत्येक गावात विकासाची गंगोत्री आणली.आता पदावर नसलो तरी विकासाची नाळ जुडवून ठेवल्याने आपण करोडो रुपयांचा निधी आणून या विधानसभेचा विकास करण्यासाठी तप्तर आहोत. या क्षेत्रातील जनतेने मतभेद बाजूला सारून विकास कामासाठी एकत्र येण्याची गरज आहे. मी आपल्या पाठीशी सदैव उभा आहे. असे आवाहन राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री इंजि. राजकुमार बडोले यांनी केले.
अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील बोरटोला, बोंडगावदेवी, चान्ना येथे तारीख सात ऑगस्ट रोजी विविध विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी भूमिपूजक म्हणून बोंडगावदेवी ग्रामपंचायत मध्ये आयोजित छोटे खानी सभेत ईंजी. राजकुमार बडोले बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद चे गटनेते व जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर होते .यावेळी पंचायत समिती सदस्य संदीप कापगते, कुंदाबाई लोगडे ,बोंडगाव देवीच्या सरपंच प्रतिमा बोरकर, ग्रामपंचायत सदस्य डॉ. श्यामकांत नेवारे ,अमरचंद ठवरे, श्रीकांत बनपूरकर ,राधेश्याम झोडे ,सौ मेश्राम ,भाजपाचे तालुका महामंत्री भोजराम लोगडे, लैलेश शिवणकर, पुरुषोत्तम डोये, चान्ना चे सरपंच सचिन डोंगरे,उपसरपंच मोरेश्वर सोनवाणे,बोरटोला चे सरपंच कुरुंदाबाई वैद्य, उपसरपंच काशिनाथ कापसे, ग्रामपंचायत सदस्य दीपंकर ऊके तिन्ही गावचे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते. माजी मंत्री राजकुमार बडोले यांचे विशेष मार्गदर्शनात जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर यांनी ही कामे मंजूर करून घेतली आहे. यामध्ये बोरटोला येथे मग्रारोहयो अंतर्गत वीस लाखाचा गाव अंतर्गत सिमेंट रस्ता, चान्ना येथे मग्रारोहयो अंतर्गत वीस लाखाचा गाव अंतर्गत सिमेंट रस्ता, तर बोंडगावदेवी येथे मग्रारोहयो अंतर्गत वीस लाखाचा गाव अंतर्गत सिमेंट रस्ता, तर 25 -15 अंतर्गत पाच लाखाचा सिमेंट रस्ता या बांधकामाचे भूमिपूजन माजी मंत्री राजकुमार बडोले यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर यांनीही बोंडगाव देवी जिल्हा परिषद क्षेत्रासाठी खासदार सुनील मेंढे. माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या प्रयत्नाने तथा जिल्हा निधी व विविध योजनेतून विकास साधण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीत आहे. यापुढेही क्षेत्राच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. त्यामुळे क्षेत्राचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय असल्याचे सांगितले. सभेचे प्रस्ताविक ग्रामपंचायत सदस्य अमरचंद ठवरे, संचालन ग्रामसेवक डी.डी. लंजे तर आभार प्रदर्शन श्रीकांत बनपूरकर यांनी केले भूमिपूजन कार्यक्रमाला तिन्ही गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.