संजय राऊतांकडून नारायण राणेंविरोधात मानहानीचा खटला दाखल

0
6

काय आहे प्रकरण?

मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात मुलुंड कोर्टात गेले आहेत. सेटिंग करून संजय राऊत यांचं नाव मतदान यादीत टाकलं असं नारायण राणे बोलले होते.याच वक्तव्यावरुन नारायण राणेंच्या विरोधात संजय राऊत यांनी मानहानीचा खटला दाखल केला आहे.

संजय राऊत यांनी म्हटलं की, नारायण राणे यांच्या विरोधात मी कोर्टात आलो आहे. 15 जानेवारी 2023 रोजी त्यांनी भांडूप येथील सभेत माझ्या विरोधात भाष्य केलं होतं. संजय राऊतांना मी खासदार बनवलं असं त्यांनी सांगितलं.माझ्याकडे पुरेशी कागदपत्रे नव्हती,. माझं मतदार यादीत नाव नाही हे असं कसं बोलतात. त्यांनी सेटिंग करून माझं नाव मतदान यादीत टाकलं असं बोलत आहेत. मी कोर्टात माझा जबाब दिलेला आहे. त्यांनी कोणाशी सेटिंग लावली ते सांगावं लागेल. त्यांनी सांगितलं नाही तर त्यांची खासदारकी धोक्यात आहेत. त्यांना आता उत्तर द्यावं लागेल. मी मानहानीचा खटला दाखल केला आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

तुम्हाला जसं मुख्यमंत्री बनवलं तसं मला बाळासाहेब ठाकरेंनी खासदार बनवलं आहे. तुम्ही तेव्हा सेटिंग लावली आता तुमचे पुरावे तुम्ही सेटिंग लावून आणा. कोर्टाने आम्हाला पुढील तारीख 29 सप्टेंबरला देण्यात आली आहे, अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली.

नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत, त्यांनी विचारपूर्वक बोलायला हवं. दोन दिवसांपूर्वीही अविश्वास प्रस्तावादरम्यान त्यांची भाषा तुम्ही पाहा. केंद्रीय मंत्र्यांना अशी भाषा शोभत नाही. तुम्ही गुंड असाल, पण सभागृहात नाही, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.