स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी मेरी माटी,मेरा देश या उपक्रमाचे थाटात उद्घाटन

0
22

अर्जुनी मोरगाव,दि. १२: तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय प्रतापगड येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी मेरी माटी, मेरा देश या उपक्रमाचे शुभारंभ जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंजि यशवंत गणविर यांच्या अध्यक्षतेखाली व पं.स.सदस्या आम्रपाली डोंगरवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने वृक्षारोपण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मार्गदर्शन करताना,देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षं पूर्ण झाली,आपण सर्व जण स्वाभिमान बाळगून देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतो.देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या महामानवांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी अशाप्रकारचे विविध उपक्रम राबविले जात आहेत.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महामानवांनी बलिदान दिले व आजही देशाच्या सिमेवर भारतीय सैनिक जीव मुठीत धरून शत्रुशी लढत आहेत,आज आपल्या इथे देशाच्या सिमेवर लढुन सेवानिवृत्त होऊन आजही लोकसेवा करत आहेत.
पुढे बोलताना ते म्हणाले,आज सर्व सोयी सुविधा उपलब्ध असताना भारतीय सैन्यात आपल्या गावातील एकही व्यक्ती नाही,मागील दशकात दोन व्यक्ती सैन्यात सेवा देत होते त्यांचा आज आपल्या गावाच्या वतीने त्यांचा सत्कार केला हा त्यांचा सत्कार नसुन त्यांनी केलेल्या कार्याची पावती आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सरपंच भोजराम लोगडे, पोलीस पाटील योगेश जनबंधु,माजी सैनिक गोवर्धन डोंगरवार,पप्पु नाईक, ग्रामपंचायत सदस्य हर्षा राऊत,नलु हुर्रा,रेवता गहाणे,गिता बावणे,सिएचओ चव्हाण,पुजा बावणे पोलिस पाटील जरुघाटा,शाळा समितीचे अध्यक्ष सुरेश मळकाम,वनरक्षक स्वाती मसारकर तथा गावकरी, शालेय विद्यार्थ्यी,आशासेविका, आरोग्य परिचारीका उपस्थित होते.