स्व. संकेत फुके यांच्या स्मरणार्थ देवरी येथे रुग्णसेवेसाठी रुग्णवाहिका समर्पित..

0
16

हायवे ग्रुपचा पुढाकार, रमेश फुके, सौ. रमाताई फुके यांच्या हस्ते सेवेचे उद्घाटन.

देवरी. 13 ऑगस्ट- जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांचे लहान बंधू दिवंगत संकेत रमेश फुके यांचे प्रथम पुण्य स्मरणार्थ म्हणून आज 13 ऑगस्ट रोजी देवरी येथे गरजू रुग्णांच्या आपात्कालीन सेवेसाठी निःशुल्क रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली.

हायवे ग्रुप देवरी मार्फत नगर पंचायत देवरी येथे रुग्णवाहिका सुपूर्द करण्यात आली. या निःशुल्क रुग्णवाहिका सेवाच्या शुभारंभ श्री रमेशजी फुके, सौ. रमाताई फुके, डॉ. परिणय फुके आणि फुके परिवाराच्या शुभहस्ते नगर पंचायत कार्यालय देवरी येथे करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके, भाजपा जिल्हा संघटन मंत्री वीरेंद्र (बाळाभाऊ) अंजनकर, माजी नगरसेविका सौ. परिणिता फुके, सौ. प्रियाताई संकेत फुके, माजी आमदार संजय पुराम, तुळशीराम जी गहाणे, न.प.अध्यक्ष देवरी संजू उईके, जि.प.सभापति सौ. सविताताई पुराम, देवरी न.पं.च्या उपाध्यक्षा सौ. प्रज्ञाताई प्रमोद संगीडवार, अनिल येरणे, न.प.चे मुख्याधिकारी प्रणय तांबे, हायवे ग्रुपचे विजय गहाणे, एमपीएससी सभापति प्रमोद संगीडवार, यादोराव पंचमवार, झामसिंग येरणे, महेश जैन सर्व नगर पंचायतींचे सभापती, नगरसेवक, माजी नगरसेवक व देवरीतील मान्यवर उपस्थित होते.