सिरेगावबांध येथे आजादी का अमृत महोत्सव थाटात साजरा

0
33

अर्जुनी मोर. ( सुरेंद्रकुमार ठवरे)- तालुक्यातील स्मार्ट गाव शिरेगाव बांध येथे आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत मेरी मिट्टी मेरा देश उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आले
सर्वप्रथम जिल्हा परिषद सदस्य रचनाताई गहाणे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच सौ. सागर चिमणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर शिलाफलक उभारून त्याचे विधिवत उद्घाटन करून वसुधा वंदन अंतर्गत स्वातंत्र संग्राम सैनिक व वीरांना वंदन करण्यात येऊन पंचप्रण शपथ घेण्यात आली. यावेळी रचनाताई गहाणे यांचे हस्ते कलश व माती पूजन करून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला उपसरपंच हेमकृष्ण संग्रामे, मनोहर चिमणकर, दिलीप गजापुरे, छाया गहाणे, ग्रामसेवक बनसोड, दिलीप लोधी, मस्के सर, जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.