गोरेगांव :- मॉडेल कॉन्वेंट एण्ड सायन्स ज्यू. कॉलेज गोरेगांव मधील मुलींनी वय 14 वर्ष व 17 वर्ष वयोगटातून तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून आपली निवड जिल्हा स्तरावर केली आहे. 14 वर्ष वयोगटात कु.वैष्णवि मडावी, हिमांशी घटारे, अरनि पटले, भाविका पटले तर 17 वर्ष वयोगटात वैष्णवी रहांगडाले, तुलसी बिसेन, चेतना बिसेन तुलसी बिसेन, आरुषि पारधी यांनी सहभाग घेऊन आपली निवड जिल्हास्तरावर केली आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय क्रीड़ा शिक्षक आशिष रामटेके यांना दिले आहे. त्यांच्या यशाबद्दल संस्था सचिव प्रा.आर. डी. कटरे, प्रशासकीय अधिकारी श्री सी. बी. पटले, प्राचार्य सौ. सी. पी. मेश्राम, पर्यवेक्षक कु. एस. डी. चीचामे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्माचारि यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करून कौतुक केले.