शासनाच्या महसूल विभागाला देसाईगंज तहसीलला नियमित तहसीलदार सांपडेना

0
8

नागरीकांचे अनेक प्रकरणे प्रलंबित: नियमित तहसीलदार नसल्याने प्रभारी अधिकारी ठोस निर्णय घेईना

देसाईगंज-गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या देसाईगंज तहसील कार्यालयातील तहसीलदार पद १२ मार्च पासुन रिक्तच असुन शासनाला देसाईगंज तालुक्याकरिता मागील पाच महिन्यांपासून नियमित तहसीलदार सांपडत नसल्याने प्रभार नायब तहसीलदार कडे असल्याने ठोस निर्णया अभावी नागरिकांचे अनेक कामे खोळंबली आहेत.
देसाईगंजचे तहसीलदार संतोष महल्ले यांची १२ मार्चला तडकाफडकी देवरीला बदली झाली होती. तेव्हा पासुन देसाईगंज येथील तहसीलदार पद प्रतिनियुक्तीवरच आहे. आता महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाला तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापना सर्व साधारण बदल्या सन २०२३ अंतर्गत देसाईगंज तहसीलदार पदावर बदली करण्यासाठी अद्यापही एकही तहसीलदार न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मागील पाच महिन्यांपासून नियमित तहसीलदार नसल्याने प्रभारी अधिकारी ठोस निर्णय घेण्यात असमर्थत ठरत असल्याने नागरिकांच्या समस्या सुटत नसुन प्रचंड हाल होत आहेत.

पाच महिन्यांपासून कामकाज वाय्रावर

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाचे सहसचिव डॉ माधव वीर यांनी १२ एप्रिलला तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापना सर्व साधारण बदल्या सन २०२३ अंतर्गत गडचिरोली जिल्हा पुरवठा विभागात खरेदी अधिकारी या पदावर कार्यरत गजानन कोकड्डे यांची देसाईगंज तहसीलदार पदावर बदली करण्यात आली होती. या आदेशान्वये एकतर्फी कार्यमुक्त करून पदस्थापनेच्या पदावर १७ एप्रिलला रुजू होण्यासाठी आदेशित केले होते मात्र ते रुजू झाले नाही. तत्पूर्वी नायब तहसीलदार अविनाश पिसाळ यांच्या कडे प्रभार होता. त्यानंतर परिविक्षाधीन म्हणून प्रियेंश महाजन रुजू झाले. त्यानंतर १० जुनला तहसीलदार म्हणून करिष्मा चौधरी होत्या. त्यानंतर त्या देखील सोडुन गेल्या. तेव्हा पासून नायब तहसीलदार मुनेश्वर गेडाम यांच्या कडे प्रभार सोपविण्यात आले आहे. हे पद नियमित तहसीलदार नसल्याने ठोस निर्णय घेण्यात असमर्थत ठरत असल्याने नागरिकांच्या समस्या सुटत नसल्याने ओरड सुरू आहे.