शासनाला 11.50 कोटी रुपयांचा महसूल मिळवून दिल्याबद्दल स्वातंत्र्य दिनी पत्रकार राजेशकुमार तायवाडे यांचा गौरव

0
4

गोंदिया- पोलीस मुख्यालय कारंजा येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्या हस्ते पत्रकार राजेशकुमार तायवाडे यांचा प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.याप्रसंगी जिल्हा परिषदचे मुख्याधिकारी अनिल पाटील, व जिल्हा पोलीस अधिक्षक निखिल पिंगले प्रामुख्याने उपस्थित होते.
2019 मध्ये मुंबई ते हावड़ा तिसऱ्या रेल्वे लाईनच्या कामात मोठ्या प्रमाणात अवैध गौणखणीजाची चोरी केली जात आहे. अशी तक्रार संबंधित अधिकाऱ्यांना राजेशकुमार तायवाडे यांनी आपल्या जिवाची परवा न करता केले होती. ज्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी सदर पिवीआर कंपनीवर 11.50 कोटी रुपयांचा दंड लावलेला आहे. सध्या वसुली प्रक्रिया सुरु आहे.