धमदिटोला जिल्हा परिषद शाळेला शिक्षक कधी मिळणार?

0
6

प्रितम रामटेके ग्रा.पं.सःस्य
अर्जुनी मोर:-– तालुक्यातील गट ग्रामपंचायत परसटोला अंतर्गत धमदिटोला हे गाव आहे. या गावात आदिवासी संपूर्ण कुटुंब आहेत. या ठिकाणी जिल्हा परिषद ची शाळा आहे. जवळपास 40 विद्यार्थी या विद्यालयात शिकत आहेत. या ठिकाणी दोन शिक्षकांची नियुक्ती होती .परंतु एक शिक्षक आरोग्याच्या दृष्टिकोनातून बाहेरगावी गेल्यामुळे, फक्त एक शिक्षक कार्यरत होते. ते शिक्षक त्यांना महत्त्वाच्या कामामुळे रजेवर गेल्यामुळे , त्यावेळेस आठ-दहा दिवस तेथील स्वयंपाक करणारी बाईनी शाळा चालवली. ही माहिती मिळताच गावातील लोक एकत्र झाले. आणि पंचायत समितीला निवेदन दिले. त्यामुळे फक्त एक शिक्षक त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण पासून वंचित करणे हे शासनाचे उद्दिष्टे आहे किंवा काय हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य प्रितम रामटेके यांनी पंचायत समितीला व जिल्हा परिषद ला अशी मागणी केली आहे की तात्काळ पुन्हा एक शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध करावा. नाहीतर विद्यालय समोर आमरन उपोषण करण्यात येईल. असा इशारा त्यांनी दिलेला आहे.