
दिव्यांगांसाठी ३ डिसेंबरपर्यंत नवीन धोरण – आ. बच्चू कडू
गोंदिया:जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग,जिल्हा आरोग्य विभाग व समाजकल्याण उपायुक्त कार्यालयातर्फे आयोजित दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान कार्यक्रमाचे आज 17 आॅगस्टला आयोजन सकाळी 11 वाजता करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राज्यात नव्याने तयार झालेल्या दिव्यांग विभागाचे कॅबीनेट दर्जा प्राप्त अध्यक्ष असलेले आमदार बच्चू कडू यांना आमंत्रित करण्यात आले होते.विशेष म्हणजे वेळ आणि तारीख सुुध्दा त्यांनीच ठरवून दिल्यानंतरही दिव्यांगाची काळजी आपल्याशिवाय कुणालाच नाही असे सांगणारे बच्चूभाऊच तब्बल कार्यक्रमाला 3 तास उशीरा आल्याने त्यांच्याकरीता सकाळपासून जिल्ह्यातील कानाकोपर्यातून आलेल्या दिव्यांगबंधू भगिणींना ताटकळत वाट बघत बसावे लागले.
जिल्ह्यातील आठही तालुक्यातून दिव्यांगाना प्रा थमिक आरोग्य केंंद्राच्या रुग्णववाहिकेतून कार्यक्रमस्थळी सकाळी 10 वाजेपासूनच आणणे सुरु झाले होते.मात्र दिव्यांगाची काळजी घेणारे कॅबीनेट दर्जा असलेले बच्चू कडूू हे तब्बल 3 तास कार्यक्रमाला उशीरा आल्याने दिव्यांग नागरिकांना मात्र मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला.त्यातही उशीरा आलेल्या कडूंनी अवघ्या अर्धा तासातच आपला कार्यक्रम आटोपता घेत तिरोड्यातील अदानी प्रकल्पातील कामगारांच्या समस्या एैकण्यासोबतच सरांडीकडे प्रयाण केले.त्यांच्या या अर्धातासाच्या धावत्या दौर्याने खरंच दिव्यांगाना न्याय मिळाले काय हा सुुध्दा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने आल्यावर दिव्यांग बांधवांच्या तक्रारींची सुनावणी होत नव्हती. पण आता दिव्यांग बांधवांच्या तक्रारींकरिता संपूर्ण राज्यभर मी फिरत आहे. त्यांच्याकडून मिळणाऱ्या तक्रारींतून ३ डिसेंबरपर्यंत एक नवीन धोरण आम्ही तयार करणार आहोत, अशी ग्वाही दिव्यांग कल्याण मंडळाचे अध्यक्ष आ. बच्चू कडू यांनी दिली. ते येथे जिल्हा समाज कल्याण विभागातर्फे आयोजित दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आले असता प्रसार माध्यमांशी बोलत होते.
कडू म्हणाले, महाराष्ट्रभर या संदर्भात दौरे करीत असताना एक बाब प्रकर्षाने जाणवली की कोणत्याही तालुक्याला मंडळ नाही. त्यामुळे दिव्यांग बांधवांना जिल्हा कार्यालयात येऊन प्रमाणपत्र घ्यावे लागते. या संदर्भात सीईओ आणि जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून शिबिरातून किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रातून प्रमाणपत्र वितरण करता येईल असे सांगितले.