साथरोग निंयत्रणासाठी सज्ज व्हा!- जि. प.‌ उपाध्यक्ष  यशवंत गणवीर

0
17

*पुरग्रस्त गावांकडे विशेष लक्ष ; कर्मचाऱ्यांना मुख्यालय राहण्याच्या सूचना
………….
गोंदिया, ता. 19 : जिल्ह्यातील नागरीकांचे आरोग्य अबाधित ठेवणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. पावसाळ्याच्या दिवसांत जलजन्य व कीटकजन्य आजारांची साथ पसरते. त्यामुळे साथरोग नियंत्रणासाठी सज्ज रहा, असे आवाहन जिल्हा परिषद गोंदियाचे उपाध्यक्ष तथा आरोग्य शिक्षण व क्रीडा समिती सभापती इंजि. श्यशवंत गणवीर यांनी केले. शुक्रवारी (ता. 18 ) जिल्हा परिषद येथे आरोग्य समितीची सभा पार पडली. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
पावसाळ्यात जलजन्य व कीटकजन्य आजारांची साथ पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई गरजेची आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेसा औषध साठा उपलब्ध ठेवा. डेंग्यु, मेंदुज्वर, हिवताप, चिकनगुनिया बाबतचे सर्वेक्षण करून डास उत्पत्ती स्थाने नष्ट करण्यावर भर देण्यात यावा, विविध जलस्त्रोतांचे पाणी नमुने तपासावे, गटार वाहते करावे. पाणी टाकी व विहिरीचा परिसर स्वच्छ करावा, टीसीएल साठ्याची पाहणी करावी, गावातील पाणीपुरवठा करण्यात येत असल्या योजनांचे सर्वेक्षण करून जलवाहिनी व व्हॉल्व्हला गळती असल्यास ग्रामपंचायतीने ते बंद करण्याची कार्यवाही करण्याच्या सुचना ग्रामपंचायत स्तरावर देण्याचे निर्देश जिल्हा परिषद गोंदियाचे उपाध्यक्ष तथा आरोग्य शिक्षण व क्रीडा सभापती इंजि. गणवीर यांनी यावेळी दिले.
आरोग्य समितीचे सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य डॉ. भुमेश्वर पटले, श्रीमती छायाताई नागपुरे , श्री. पवन पटले, श्रीमती वैशालीताई पंधरे, , श्रीमती गिताताई लिल्हारे, श्रीमती सुधाताई रहांगडाले, श्रीमती पौर्णिमाताई ढेंगे, श्रीमती रचनाताई गहाणे, समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे, सहाय्य्क संचालक कृष्ठरोग डॉ. रोशन राऊत, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. नितीन कापसे, तालुका आरोग्य अधिकारी गोरेगाव डॉ. विनोद चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी देवरी डॉ. ललित कुकडे, तालुका आरोग्य अधिकारी सालेकसा डॉ. अमित खोडनकर, तालुका आरोग्य अधिकारी अर्जुनी मोरगाव डॉ. विजय राऊत, तालुका आरोग्य अधिकारी तिरोडा डॉ. स्वाती घोडमारे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, जिल्हा साथरोग तज्ञ डॉ. सुशांकी कापसे तथा आरोग्य विभागाचे जिल्हास्तरिय अधिकारी व पर्यवेक्षक उपस्थित होते.
——-
*पूरग्रस्त गावाकडे विशेष लक्ष*
जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पावसाळ्यात पूराचे संकट ओढविते. त्या पार्श्वभूमीवर अधिक सजग राहणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील सर्व केंद्रातील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालय राहण्याच्या सूचना निर्गमित कराव्यात. नदीकाठावरील व पुरग्रस्त गावांकडे विशेष लक्ष द्यावे. त्याठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात. अपेक्षित प्रसूती होणाऱ्या गरोदर मातांना संरक्षित ठिकाणी प्रसूतीसाठी घेऊन जाण्यासाठी सर्व रुग्णवाहिका सुस्थितीत ठेवाव्यात. तथा पावसाळ्यात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुकास्तर व जिल्हास्तरावर साथरोग नियंत्रण कक्षाची स्थापना करण्याचे निर्देश जिल्हा परिषद गोंदियाचे उपाध्यक्ष तथा आरोग्य शिक्षण व क्रीडा सभापती. इंजि.  यशवंत गणवीर यांनी दिले.
—–