41.3 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home राजकीय भारतरत्न राजीव गांधीच्या जयंती निमित्त काँग्रेस कमेटीनी केले नमन

भारतरत्न राजीव गांधीच्या जयंती निमित्त काँग्रेस कमेटीनी केले नमन

0
16

blank

गोंदिया- देशात आधुनिक क्रांती घडून आनणारे देशाचे माजी पंतप्रधान व भारतरत्न राजीव गांधीच्या 79 जयंतीच्या निमित्त जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमाने काँग्रेसच्या शहीद भोला काँग्रेस भवन मध्ये त्यांच्या प्रतिमेचेवर माल्यार्पण करून अभिवादन केले.त्यानंतर कालेखा कंपनीच्या समोर राजीव गांधी चौकात त्यांच्या छायाचित्राचे पूजन करून “राजीव गांधी अमर रहे” के नारे लावण्यात आले.आधुनिक क्रांतीचे फायदे देशाला कसे मिळाले यावर चर्चा करण्यात आली.राजीव गांधीनी ह्या देशात कम्प्युटर तथा मोबाईल क्रांति आणली.सर्वात आदी प्रभू श्रीरामाचे देवळाचे कपाट उघडले.आज जयंतीच्यावेळी जिला अध्यक्ष एवं माजी आमदार दिलीप बन्सोड, सेवादल जिल्हाध्यक्ष इंजि राजीव ठकरेले, युवक काँग्रेस जिलाध्यक्ष राजकुमार (बाबा) बागडे, जिला महासचिव निलम हलमारे, जिला महासचिव योगेश अग्रवाल, कृउबास उपसभापती राजकुमार (पप्पू) पटले, जिला महासचिव ओबीसी विभाग अजय राहांगडाले, शहराध्यक्ष अनुसूचित विभाग अमर राहुल, रुपाली ऊके, चित्रा लोखंडे, नीलिमा नागदवने, कृउबास संचालक अरुण गजभिये, गौरव बिसेन, मंथन नंदेश्वर, मनीष चव्हाण, भरत खापरडे, कृष्णा बिभर, सलाम भाई, पंकज पिल्ले इत्यादि होतें.