
तिरोडा--महाराष्ट्र राज्यात 50% पेक्षा जास्त लोकसंख्या शहरी भागात वास्तव्यास आहे. शहरी भागातील जनसामान्य, गोरगरीब, झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत “नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र “15 व्या वित्त आयोग अंतर्गत स्थापित केली आहेत.
शहरी भागातील अतिशय दाटीवाटीने वसलेल्या भागापासून तसेच झोपडपट्टी वस्ती पासून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा/ उपजिल्हा रुग्णालयातील अंतर जास्त असणे, जिल्हा रुग्णालयातील वाढत्या रुग्णसंख्येचा भार कमी करण्याच्या उद्देशाने “नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र” स्थापीत केली आहेत. जिल्ह्यातील नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र अत्याधुनिक तंत्रज्ञानाने स्मार्ट बनवण्यासाठी, सातत्यपूर्ण,आरोग्य गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान करण्यासाठी, विविध रोगांच्या प्रादुर्भावाचे निरीक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी, तसेच सुलभ आणि परवडणारी जागतिक दर्जाची दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करून संपूर्ण समाजाचा आरोग्य निर्देशांक वाढवण्याकरिता “नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र “च्या माध्यमातून शहरी भागातील जनसामान्य, गोरगरीब, झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी व गरजू रुग्णांना सेवा देण्याचा राज्य शासनाचा मानसातुन 21 ऑगस्ट रोजी तिरोडा तालुक्यातील “नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र अशोक वार्ड“ लोकांना समर्पित करण्यात आले.
तिरोडा – गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ रहांगडाले व ईतर मान्यवरांच्या हस्ते नागरी आरोग्यवर्धिनि केंद्राचे फित कापुन उद्घाटन केले. उद्घाटन सोहळा प्रसंगी तिरोडा–गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ रहांगडाले,अशोक असाटी,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वाती घोडमारे,उपजिल्हा रुग्णालय तिरोडाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.संजय भगत, सेजगाव कार्यक्षेत्र जिल्हा परिषद सदस्य प्रविणभाऊ पटले, ठाणेगाव कार्यक्षेत्र जिल्हा परिषद सदस्य अॅड. माधुरीताई रहांगडाले ,अर्जुनी कार्यक्षेत्र जिल्हा परिषद सदस्य चत्रभुज बिसेन, पंचायत समितीचे उपसभापती हुपराज जमईवार,अर्जुनी कार्यक्षेत्र पंचायत समिती सदस्य चेतलाल भगत,सुकळी डाक कार्यक्षेत्र पंचायत समिती सदस्य विजयजी बिंझाडे,केसलेवाडा कार्यक्षेत्र पंचायत समिती सदस्य श्रीमती प्रमिलाताई भलाई ,कोयलारी कार्यक्षेत्र पंचायत समिती सदस्य श्रीमती दिपालीताई टेंभेकर प्रामुख्याने उपस्थित होते.