
अर्जुनी मोरगाव,दि.22-झाशीनगर हे अतिदुर्गम भागात वसलेले आदिवासी बहुल क्षेत्रातील गाव,या गावाला दळणवळणाच्या साधनांचा अभाव,सोयी सुविधांचा अभावामुळे स्थानिक जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतो.तीच बाब लक्षात घेऊन गाव तेथे दवाखाना हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक गावात आरोग्य शिबीर आयोजित करून, वेळेवर योग्य उपचार मिळावा यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आले आहे.सरकारी दवाखान्यात गोर गरीब कष्टकरी शेतकरी व शेतमजुर आपली तपासणी करून घेण्यासाठी येतात परंतु कधीकधी तेही शक्य होत नाही,आपले आरोग्य चांगले राहावे असे प्रत्येक व्यक्तीला वाटते असे तालुक्यातील झाशीनगर येथे जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य यांच्या संकल्पनेतून आयोजित आरोग्य शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी इंजि यशवंत गणविर बोलत होते.
आपल्या गावात आयोजित आरोग्य शिबीराच्या माध्यमातून आपण आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी, दुर्धर आजार, नेत्ररोग, दंतरोग, लहान बालके,गरोदर माता,स्तनदा माता यांनीही शिबीराचा लाभ घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घ्यावी.आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊन आपला परिसर स्वच्छ ठेवावा,असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सरपंच आशाताई गदवार, उपसरपंच रवींद्र नाईक,शाळा समितीचे अध्यक्ष भोजराम हिळको, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मीताई मेश्राम,संजीव गुरनुले,कुंजीलाल कावळे,सदारामजी गुरनुले,लताताई किरसान, भिमराव नंदेश्वर, योगेश जनबंधु, डॉ.प्रविण दखने, डॉ.आनंद पाटील, डॉ.डोंगरवार, डॉ.भुषण मेंढे व गावकरी उपस्थित होते.