माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा पुन्हा ठाकरे गटात प्रवेश:मातोश्रीवर हाती बांधले शिवबंधन

0
6

मुंबई –शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आज पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते त्यांनी हाती शिवबंधन बांधले. उत्तर नगर जिल्ह्यातील शेकडो समर्थकांसह शिवबंधन बांधण्यासाठी वाकचौरे शिर्डीतून मातोश्रीवर दाखल झाले आहेत. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पक्षप्रवेशामुळे शिर्डीत ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अकोला पूर्वचे माजी आमदार हरिदास भदे हेदेखील आता राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून ठाकरे गटात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. मंगळवारीच त्यांनी उद्धव ठाकरेंना भेटीसाठी वेळ मागितल्याची माहिती आहे.

नगर जिल्ह्यात ताकद वाढणार

उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे 13 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. त्यामुळे पुन्हा हे मतदारसंघ जिंकण्यासाठी ठाकरे गटाकडून जोरदार तयारी केली जात आहे. प्रत्येक मतदारसंघात तगडा उमेदवार उद्धव ठाकरेंकडून शोधला जात आहे. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशामुळ् अहमदनगर जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे.