निंबा तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बुधराम बिजेवार यांची निवड

0
37

गोरेगाव,दि.24- तालुक्यातील ग्राम पंचायत निंबा येथे महात्मा गांधी तंटामुक्ती समिती गठीत करण्याबाबत आयोजित विशेष ग्रामसभेच्या अध्यक्ष सरपंच वर्षाताई विजय पटले होत्या.सभेमध्ये सुचविलेल्या प्रमाणे एकमताने बुधराम तुकाराम बिजेवार यांची ग्रामस्थांनी एकमताने तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड केली. यावेळी समिती सदस्य म्हणून श्रीमती वर्षाताई विजय पटले (सरपंच),पुरुषोत्तम रतिराम कटरे( उपसरपंच),सुनीता लेदे (अंगणवाडी सेविका),मोहन बिसेन (सहायक शिक्षक),संजय शहारे( ग्रा प सदस्य ),एड.प्रशांतजी डोये,ब्रह्म पुसाम ,जागेसर वाढई,मालताताई भगत, सूर्यभान साखरे, संतोष सेउत,राधेश्याम पारधी, पृथ्वीराज पारधी, योगराज ठाकरे, अनंतराम उईके, वामन परसगाये, निपाने (विद्युत विभाग), आर.पी.पटले (पोलीस विभाग), विनोद खोब्रागडे, व्ही.बी.सूर्यवंशी (ग्राम विकास अधिकारी),आर.पी.मौजे (तलाठी),माधव रामाजी शिवणकर इत्यादींच्या समितीमध्ये सदस्य म्हणून समावेश करण्यात आला. यावेळी महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षासह सदस्यांना शुभेच्छा दिल्या.मागील महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ताराचंद परसगाये यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.ग्रामपंचायत निंबा येथील सभा आहे अतिशय शांततेत पार पडली सभेमध्ये आलेल्या सर्व ग्रामस्थांचे आभार उपसरपंच पुरुषोत्तम कटरे यांनी मांनले.