निंभोरा बोडखा दरम्यानची घटना
अमरावती, दि. 25 :- समृद्धी महामार्गाला अपघातांचे ग्रहण लागल्याचे अनुभवास येत असून धावत्या वाहानावरील नियंत्रित सुटल्याने पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात चालक जागीच ठार तर तीन प्रवासी गंभीर जखमी झाले.
शनिवार दिनांक २५ नोव्हेंम्बर रोजी पहाटे मुबंई येथून आपले काम आटोपून ओरिसा राज्यात आसलेल्या राहत्या गावी कटक येथे परत जाण्यासाठी नेक्सा चारचाकी वहाण क्र.ओ.डी.०२ बी.व्ही.०७०१ समृद्धी महामार्गाने निघाले. निंभोरा बोडखा ते सावळा दरम्यान सकाळी साडेदहाच्या सुमारास वाहन चालकाचे सदरच्या धावत्या वाहनावरील नियंत्रण सुटले व महामार्गावर असलेल्या चॅनल क्रमांक ९१/९०० जवळ या वाहनाला अचानक भीषण अपघात झाला.चौघांनाही वैद्यकीय उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यातील एकाला मृत घोषित केले यामध्ये घटनास्थळी वाहन चालक मोहम्मद शकील (३६) रा. बांदा (उत्तर प्रदेश) याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने याचा मृत्यू झाला असल्याचे माहिती मिळाली.निसार खान (४८),शमसू कलम (४२) व ताराकांत दास (२६) हे गंभीर जखमी झाले असून यांना पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
——————