गोंदिया -गोंदिया जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी कार्यवाह तथा वर्तमान मार्गदर्शक, गोरेगांव तालुका खाजगी अनुदानित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सह.पत संस्था गोरेगांव चे अध्यक्ष, मुख्याध्यापक बी.डब्लु. कटरे परशुराम विद्यालय मोहगांव हे ता.30नोव्हेबंर रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेत.
आदरणीय सरांचा सेवानिवृत्तीपर सत्कार परशुराम शिक्षण प्रसारक संस्था गोरेगांव च्या वतिने संस्थेचे सचिव तथा माजी खासदार /आमदार डाॅ.खुशाल बोपचे व अध्यक्ष तथा राॅ.का.नेते रविकांत बोपचे यांच्या हस्ते,व गोंदिया जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतिने माजी कार्यवाह से.नि.प्राचार्य खुशाल कटरे व मुख्याध्यापक एस.बी.पटले यांच्या हस्ते, परशुराम विद्यालय मोहगाव बु.येथे करण्यात आले.या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक स.शि.श्रीमती भारती कटरे यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन स.शि.व्ही.एस.मेश्राम तर आभार प्रदर्शन स.शि.टी.एफ.ईळपाचे यांनी केले.या प्रसंगी परशुराम विद्यालय मोहगाव बु.येथील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, स्वामी विवेकानंद विद्यालय कारंजा येथील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
जि.प.गोंदियाच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख व प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डाॅ.महेंद्र गजभिये यांच्या हस्ते त्यांच्या दालनात बी.डब्लु.कटरे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला.या प्रसंगी माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी श्री.दिघोरे व शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.