अर्जुनी मोर. – आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून खरेदी करण्यात येत असलेल्या हमी भाव धान खरेदी केंद्राचे उदघाटन ता.( 1 ) आदिवासी विविध कार्यकारी संस्था बाराभाटी येथे माजी मंत्री राजकुमार बडोले यांचे हस्ते काटा पूजन करुन करण्यात आले.
आदिवासी विविध कार्यकारी संस्था बाराभाटी ही जवळपास च्या अकरा गावामिळुन तयार करण्यात आली आहे. संस्थेमार्फत धान खरेदी केव्हा सुरु होणार याची शेतकरी चातकाप्रमाणे वाट पहात होते.अखेर आदिवासी विकास महामंडळाने हिरवी झेंडी दिल्याने ता.1 डिसेंबर रोजी हमी भाव धान खरेदी केंद्राचे रितसर उदघाटन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री राजकुमार बडोले, संस्थेचे अध्यक्ष तुलाराम मारगाये, उपाध्यक्ष व्यंकट खोब्रागडे, आदिवासी विकास महामंडळाचे चौधरी,विजयसिंह राठोड,अनिल दहीवले, लिलाधर ताराम, लैलेश्वर शिवनकर, सुरेश परशुरामकर, घनश्याम ताराम, निलकंठ भोयर,कमलेश शिवनकर, संचालक तागडे, भुमेश्वर वाढई,लालदास औरासे,प्यारेलाल रंगारी, नरेश खोब्रागडे, विलास बन्सोड, श्रावण मेंढे, किशोर बेलखोडे, संजय बन्सोड व संस्थेचे सर्व संचालक व कर्मचारी तथा अकरा गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उदघाटन सोहळ्याची कार्यवाही संस्थेचे व्यवस्थापक राजेश चुलपार यांनी पार पाडली.