भिमाच्या लेकरांनी उद्धारकर्त्यांना केली मानवंदना

0
23
रॅलीद्वारे बाबासाहेबांना केले अभिवादन
धाराशिव दि.7 – महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा येथे भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने सकाळी १० वाजता डॉ आंबेडकर यांना सामूहिक महावंदना घेऊन अभिवादन करण्यात आले. तर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भीम नगर येथील क्रांती चौकातून भीम अनुयायांनी शहरातील विविध मार्गाने कॅण्डल मार्च काढीत बाबासाहेबांना मानवंदना दि.६ डिसेंबर रोजी दिली.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे सकाळपासूनच भीम अनुयायांनी अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सामूहिक महाबुद्ध वंदना भारतीय बौद्ध महसभेच्यावतीने घेण्यात आली. यावेळी विनिता गंगावणे, कुसुम गायकवाड, मीरा शिंदे, जीविका बनसोडे, मीरा पायाळ, पेशकार शामल वाघमारे, भीम शाहीर भिमाई बनसोडे यांच्या हस्ते डॉ आंबेडकर यांच्या हस्ते डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर सामुदायिक महाबुध्द वंदना भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक गुणवंत सोनवणे, धाराशिव तालुकाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, पर्यटन सचिव धनंजय वाघमारे, जिल्हा संघटक विजय बनसोडे यांनी घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे, नपच्या मुख्याधिकारी वसुधा फड, दादासाहेब जेटीथोर, पर्यटन उपाध्यक्ष स्वामीराव चंदनशिवे, महिला आघाडीच्या उपाध्यक्षा शीलाताई चंदनशिवे, कार्यालयीन सचिव महादेव एडके, संस्कार तालुका उपाध्यक्ष डॉ दिनकर झेंडे, तालुका संघटक सुदर्शन ओव्हाळ, मुकेश मोटे, बाबासाहेब कांबळे, राजाभाऊ बनसोडे, रिपाइंचे सोमनाथ गायकवाड, रणजीत गायकवाड, उदय बनसोडे, विद्यानंद बनसोडे, रवी माळाळे, वंचित बहुजन आघाडीचे बाबासाहेब जानराव, सोमनाथ नागटिळक, मेसा जानराव, सुशिल शिंदे, सुधीर वाघमारे, कुंदन वाघमारे, विवेक जाधव, पृथ्वीराज वाघमारे, सिद्धार्थ मंडळाचे गायकवाड, राकेश लांडगे, दादा बनसोडे, विकास सोनवणे, बाळासाहेब भोरे, नीता सोनवणे, स्नेहा सोनवणे, भावना सोनवणे, ॲड जिनत प्रधान, वर्षा गायकवाड, सोनिया डांगे, अनिता गायकवाड, अनुराधा लोखंडे, सुभाष सोनवणे, दत्तात्रय लोखंडे,‌जयश्री चव्हाण, सुप्रिया सोनवणे, राणी सपकाळ, भीमजी ऑटो रिक्षा युनियनचे सागर शिरसाटे, रोहन बनसोडे, विवेक सोनवणे, संतोष कांबळे, विशाल सरवदे, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे सुनील बनसोडे, बापू बनसोडे, डी.बी. सरवदे, राजन माने, पृथ्वीराज चिलवंत, अतुल लष्करे, डॉ रमेश कांबळे, सिद्राम वाघमारे, अनुरथ नागटिळक, अरुण बनसोडे, माजी नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, विशाल शिंगाडे, नानासाहेब भिडे, विद्यानंद वाघमारे आदींसह शहर व परिसरातील भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सरचिटणीस गायकवाड यांनी तर आभार बाबासाहेब बनसोडे यांनी मानले. दरम्यान सायंकाळी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये पुरुषासह महिला व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या‌पाशी या रॅलीची बुद्ध वंदना घेऊन सांगता करण्यात आली. दरम्यान संता सैनिक दलाच्यावतीने अभिवादनासाठी येणाऱ्या भीम सैनिक व रॅलीचे नियोजन समता सैनिक दलाचे उपाध्यक्ष जिल्हाध्यक्ष अरुण सरतापे, धाराशिव तालुका उपाध्यक्ष स्वराज जानराव, तालुका सचिव सचिन दिलपाक, प्रतिक चंदनशिवे यांनी केले.