धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय महाविद्यालयाद्वारे संविधान दिन संविधान दिवस साजरा

0
33

गोंदिया,दि.07-आपल्या भारत देशात दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थ्यांमध्ये घटनात्मक मूल्यांबद्दल आदराची भावना वाढवणे या उद्देशाने गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय महाविद्यालयाद्वारे संविधान दिन संविधान दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन ऑनलाइन पद्धतीने केले तसेच विद्यार्थ्यांना राज्यघटनेबद्दल किती माहित आहे या विषयावर गुगल फॉर्म द्वारे प्रश्नमंजुषा देखील घेण्यात आली. संविधान दिवसाच्या पूर्वसंध्येला शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रस्तावना प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉक्टर अंजन नायडू यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर स्नेहा जयस्वाल, कुमारी अवनी मेठी यांनी परिश्रम घेतले.