देवरी,दि०९- सरकारद्वारे शेतकऱ्यांना मदतीची केवळ घोषणा आणि आश्वासन दिले जाते. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या जखमांवर फक्त मीठ चोळण्याचे काम राज्य सरकार करत आहे, असा घणाघाती आरोप हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसी विरोधकांनी करून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. अवकाळी पावसाने शेतकरी त्रस्त असताना पंचनामे न करणारे सरकार मात्र चांगलेच सुस्त असल्याचे विरोधक बोलत आहे.
शेतकऱ्यांना केवळ मदत करण्याच्या घोषणा आणि आश्वासन केले जाते पण खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना कोणतेही मदत दिली जात नाही. किसान सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना दोन हजाराची मदत देतात आणि वस्तूंची दरवाढ करून दुसऱ्या मार्गाने काढून घेतात. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी एकत्र येवून विधानभवनाच्या प्रवेश दारावरील पायऱ्यांवर शासनाचे विरोध करत शेतकऱ्यांना तत्काळ भरीव मदत करण्याची मागणी उचलून धरली.
या मागण्यांमध्ये सर्वप्रथम ऑफलाईन पद्धतीने पंचनामे आणि मौका चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. ज्या कंपनींना पिक विमा करण्याची जबाबदारी दिली त्यांच्याकडून शेतकऱ्यांना भरीव आणि आश्वासन प्रमाणे रक्कम मिळवून देणे आणि अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, त्यावर वचक ठेवण्याची मागणी करण्यात आली.
महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना भाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनात आणि विरोधी पक्ष नेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार, आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.सहसरामभाऊ कोरोटे यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस पक्षाचे सर्व आमदारांनी सक्रीय सहभाग नोंदवून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले.