क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळतो:-इंजि यशवंत गणविर

0
49

अर्जुनी मोरगाव,दि.९ः- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवर्रा येथे गोठणगाव बिट स्तरीय अटल क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली.या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि यशवंत गणविर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी मनोगत व्यक्त केले म्हणाले की, मागील पाच ते सहा वर्षांपासून शाळांतर्गत क्रीडा स्पर्धा बंद झाल्या होत्या,परंतु गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अटल क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले.संपुर्ण जिल्ह्यात क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले असुन सचोटीने हा क्रीडा महोत्सव पार पाडावा.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ग्रामीण भागातील गोर गरीब, शेतकरी व शेतमजुरांची मुले जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेतात, त्यांच्या अंगी असलेले सुप्त गुण सादर करण्याची संधी या क्रीडा महोत्सवात मिळाली आहे.त्यामुळे हा क्रीडा महोत्सव आपण गोड करुन घ्यावा.या क्रीडा महोत्सवात कबड्डी,खो-खो व इतर वयक्तिक स्पर्धांचा समावेश करुन सांघिक व वयक्तिक खेळांचा समावेश करण्यात आला आहे.त्याप्रमाणे शिक्षकांनी खबरदारी घेऊन हा क्रीडा महोत्सव शांतपणे पार पाडावा.अशी सुचना यावेळी दिली.
या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य घनश्याम धामट तसेच पंचायत समिती सदस्य फुलचंद बागडेरीया, आम्रपाली डोंगरवार, सरपंच नरेंद्र लोथे, गजानन कोवे, रत्नमाला वंजारी, गणेश ताराम,लोमेश लोथे अध्यक्ष शाळा समिती,सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.