* नगर परिषदच्या महसुलावर डल्ला
* तहसीलदार यांचे संगनमत
* चंपाषष्ठी मेला वरून बनगाव येथे बाजार समिती विरूद्ध तीव्र असंतोष.
*नागरिकांनी पत्रपरिषदेत दिली माहिती
आमगाव:- आमगाव येथील नावाजलेला चंमापष्ठी मेला कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासनावर नियमबाह्य दबंगशाही मुळे बनगाव येथे बाजार समिती संचालक मंडळा विरूद्ध तीव्र असंतोष निर्माण झाले आहे.तर नगर परिषद येथील मालकी जागेवर नियमबाह्यपणे चंपाषष्ठी मेला भरउन कृषी उत्पन्न बाजार समितीने चक्क नगर परिषदचे महसूल उत्पन्नावर डल्ला मारला आहे.व तहीलदारांसह पोलीस विभागाने शासनाची फसवणूक केली असल्याचे टीका नागरिकांनी पत्रपरिषदेत केली आहे.बंनगाव येथील माता मंदिर परिसरात नागरिकांनी पत्रपरिषदेत घेतली यावेळी त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीवरील अनियमित कामांना वाचा फोडली.
आमगव येथे पूर्व विदर्भातील प्रसिद्ध असा चंपाषष्ठी मेला बाजार हा दरवर्षी आकर्षणाचा भाग असतो, परंतू बाजार समितीच्या एकाधिकारशाही पणामुळे या चंपाषष्ठी मेला हा जागेच्या अनियमित वापर व महसूल घोळ यावरून वादग्रस्त ठरला आहे.कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाचा गैरकरभाराविरुद्ध प्रशासन हतबल ठरला आहे.
नगर परिषद मालकीची गट क्रमांक ४८ आराजी ०६६.०० जमीन बंनगाव ग्रामपंचायत यांच्या हद्दीतील असून सद्दस्थितीत नगर परिषद आमगाव यांच्या कडे वर्ग करण्यात आली आहे.या जमिनीवर अनेक वर्षापासून नागरिक वार्षिक उत्सव,क्रीडा स्पर्धा आयोजित करतात. गावातील सांस्कृतिक कला साहित्य अकादमी द्वारा अनेक उपक्रम राबविले जातात. परंतु याच परिसरात अनधिकृरीत्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकाधिकारशाहीमुळे नियमबाह्य पद्धतीने मवेशी बाजाराचे लिलाव करून नगर परिषद चा महसुल बुडउन महसूल गोळा केल्या जात आहे.या अनधिकृत मिळविलेला महसूलावर कृषी उत्पन्न बाजार समिती सरळ डल्ला मारत आहे.यात स्थानिक नगर परिषद प्रशासक तथा तहसीलार यांची मूकसंमती मात्र नगर परिषद महसुल ची विल्लेवाट लावत आहे.नगर परिषद जागेवर गट क्रमांक ४८ आराजी ०.६६.० आहे.या जागेवर चंपाषष्ठी मेला लावण्यासाठी बनगाव येथील नागरिकांनी पुढाकर घेऊन शुभम मनोज कोटांगले यांनी नगर परिषद ला महसूल भरून परवानगी घेतली तर तहसील कार्यालयात पुढील परवानगी करिता अर्ज केला यात कृषी उत्पन्न बाजार समितीने भाजी बाजार व नगर परिषदच्या जागेवर चंपाषष्ठी मेला लावण्यासाठी अशरफ भाटी याला परवानगी दिली यातच जागेचा वाद निर्माण करून बाजार समितीने नियमबाह्य पद्धतीने खतपाणी घातले.कृषी उत्पन्न बाजार समिती दरवर्षी चंपाषष्ठी मेला लावण्यासाठी ठेकेदार यांच्याकडून मोठे महसूल गोळा करते. बाजार समितीच्या आवार सह नगर परिषदच्या जागेचा अनधिकृरीत्या वापर करते परंतू वापर केलेल्या जमिनीचे एकही महसूल नगर परिषदेत न भरता सरळ डल्ला मारला जातो यात नगर परिषद प्रशासक व तहसीलदार याची भूमिका संसायस्पद दिसून आले आहे.
कृषि बाजार समितीने चक्क हवेत मावेशि बाजार व चंपाषष्ठी मेला परवानगी देत सरळ नगर परिषदेची जमीन वापरून महसुल वसूल केला आहे.परंतु नगर परिषद आमगाव येथील प्रशासक व तहीलदार यांची मौन भूमिका आर्थिक घोळ झाल्याचे सिद्ध करित आहे.नगर परिषद आमगाव यांनी आपली मौजा बंनगाव येथील गट क्रमांक ४८ आराजी ०.६६.०० हे पटांगण चंपाषष्ठी मेला लावण्यासाठी ठेकेदार शुभम कोटांगले याला महसूल स्वीकारून दिनांक २२ सप्टेंबर २०२३ला परवानगी दिली.परंतु सदर जमीन कृषि उत्पन्न बाजार समिती वापरते असे पत्र पाठवून त्या जागेवर चंपाषष्ठी मेला लावण्यासाठी ठेकेदार शुभम कोटांगले ची परवानगी रद्द करण्याची मागणी केली गेली. व कृषि उत्पन्न बाजार समितीने अशरफ भाटी याला दिलेली परवानगी गृहीत घेऊन परवानगी देण्याची मागणी केली.यात प्रशासक तथा तहसीलदार यांनी जाणीवूर्वक रीतसर परवानगी घेतलेली शुभम कोटांगले यांची परवानगी रद्द करून नगर परिषद च्या मिळणाऱ्या महसुलावर पाणी फेरले.प्रशासक तथा तहसीलदार रमेश कुंभरे यांनी राजकीय दबावतंत्र खाली नगर परिषदची जमीन नियमबाह्य कृषि उत्पन्न बाजार समितीला वापरण्यासाठी हस्तांतरण केले. परंतू मिळणाऱ्या महसूल बुडेल याची खबरदारी घेण्यात आली नाही.
# प्रशासक तथा तहसीलदार रमेश कुंभरे यांच्यावर कार्यवाहीची मागणी
-:नगर परिषदची गट क्रमांक ४८ ची जमिनीवर कृषी उत्पन्न बाजार समिती नियमबाह्य पद्धतीने मागील सन २०१५ नंतर मवेशि बाजार, चंपाषष्ठी मेला लिलाव करून हवाला पद्धतीने महसूल स्वीकारून घोळ करीत आहे. परंतू नगर परिषद प्रशासक तथा तहसीलदार यांनी नागरीकांची तक्रार असून सुद्धा कोणतीच कारवाई केली नाही. उलट त्यांना संरक्षण देण्यात आले.त्यामुळे नगर परिषद आमगाव ला मिळणारे महसूल संगनमताने बुडवीन्यात आले.या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी पत्र परीषद घेऊन केली आहे.
#कृषि उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक बसविण्याची मागणी :- नगर परिषदची आमगाव मालकी हक्क जमीन वापरून नियमबाह्यपद्धतीने त्यावर मेवेशी बाजार व चंपाषष्ठी मेला लाऊन ठेकेदार यांच्याकडून मोठी रक्कम वसूल करण्यात येते. तर नगर परिषदचा संपूर्ण महसूल बुडवण्यात येत आहे . या प्रकरणाची चौकशी करून कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ यांच्याविरुद्ध अपात्र ठरवण्याची कार्यवाही करण्यात यावी व प्रशासक बसविण्यात यावें अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पत्रपरिषदेत प्रमोद शिवणकर, तीरथ येटरे, रामकिशन शिवणकर,बाळू वंजारी, सागर फुंडे,राम चक्रवर्ती, यशवंत मानकर, दिलीप फुंडे. पिंटू महारवाडे, विनोद डोये, मुकेश शिवणकर,मेघश्याम फुंडे, किशोर फुंडे, सतीश शिवणकर, सतीश थेर, विजय शेंडे, सतीश दोनोडे, लक्ष्मण शेंडे,तेजस कावळे, डॉ. ओमप्रकाश थेर, गोकुल बसेन,दिलीप मेश्राम, मोणू गिरी , संदीप भांडारकर,शिरीष भांडारकर,जितेश वाढई , मेघश्याम मेंढे आदी नागरीक व युवक यावेळी उपस्थित होते.