भंडारा : शहरातील शासकीय नर्सिंग महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या जवळपास ४७ विद्यार्थिनींना काल रात्री जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यात काही विद्यार्थिनींची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.भंडारा येथील शासकीय नर्सिंग महाविद्यालयात २०० विद्यार्थिनी एएनएम आणि जीएनएमचे शिक्षण घेत आहेत. काल रात्री जेवण आटोपल्यावर काही विद्यार्थिनींना अचानक उलट्या, मळमळ, डोकेदुखी, ताप येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने त्यांना ताबडतोब जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारकरिता दाखल केले. रात्रीपासून या विद्यार्थिनींवर उपचार सुरू असून यातील ७ विद्यार्थिनींची प्रकृती गंभीर तर एक विद्यार्थिनीची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.